पुण्यात दरोडा, जबरी चोरी, घर फोडीचे १५ गुन्हयात पाहिजे असलेला अट्टल गुन्हेगार हा खुनासहीत दरोडयाचे गुन्हयात अटक…

उपसंपादक- रणजित मस्के
पुणे :-०५ गुन्हे आले उघडकीस स्थानिक गुन्हे शाखा व पुणे ग्रामीण पोलीसांना मिळाले मोठे यश.

शिक्रापूर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४४५/२०२४ भा.दं.वि.का.क. ३०२, ३९७ प्रमाणे दि. २३/०४/२०२४ रोजी दाखल असून सदर गुन्हयात जातेगाव बु। ता. शिरूर जि पुणे येथील एक वृद्ध महिला घरात झोपलेली असताना रात्रीचे वेळी अज्ञात चोरटयांनी अनाधिकाराने घरात प्रवेश करून तिला मारहाण करून घरात चोरी केली होती. सदर घटनेत वृद्ध महिला नामे कृष्णाबाई ज्ञानेश्वर इंगवले वय ७६ वर्षे या मयत झाल्या आहेत.
सदर गुन्हयाचे घटनास्थळी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, साो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री प्रशांत दोले, शिरूर विभाग यांनी भेट दिली, पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख यांनी घटनेची पूर्ण माहिती घेवून योग्य त्या सुचना दिल्या, अशा प्रकारच्या गुन्हे कार्यपद्धतीचा अवलंब करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना चेक करणे तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळवून गुन्हा उघडकीस आणणेबावत सूचना व मार्गदर्शन केले. सदरचा गुन्हा गंभीर होता.
पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर स्थानिक गुन्हे शाखा, यांचे नेतृत्वाखाली दोन पथके तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशन कडील एक पथक अशी एकूण तीन पथके तयार करणेत आली, ग्रामीण भाग असल्याने सीसीटीव्ही फुटेजचा अभाव होता. गोपनीय बातमीदार सतर्क करून तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अविनाश रमेश काळे, प्रविण दिपक भोसले यांनी त्यांचे इतर साबीदारांचे मदतीने केला आहे.
बातमीचे आधारे
आरोपी नामे
१) प्रविण दिपक भोसले वय २१ वर्षे रा. जातेगाव फाटा, चाकण-शिक्रापूर रोड ता. शिरूर जि पुणे
२) विचीसंघषीत बालक यांना सांगली येथून स्था.गु.शा.चे पथकाने ताब्यात घेतले, त्यांचेकडील तपासादरम्यान मिळाले माहितीवरून
३) अविनाश ऊर्फ लंगडया ऊर्फ गिल्या रमेश काळे वय २८ वर्षे रा. कोळगाव मोहरवाडी, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर वास कोळगाव येथून स्वागुशा चे पथक व शिक्रापूर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
आरोपी अविनाश ऊर्फ लंगडया रमेश काळे हा एकूण १५ गुन्हयात पाहिजे आरोपी असून तो मालमत्ता चोरीचे गुन्हयातील सराईत गुन्हेगार आहे. या आरोपीकडून दरोडा, घरफोडी चोरीचे खालील एकूण ५ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलीस स्टेशन
शिक्रापूर
४४५/२०२४ भादंवि ३०२,३९२ २
४३२/२०२४ भादंवि ४५७,३८०
२५२/२०२४ भादंवि ४५७.३८०
आळेफाटा
३८९/२०२२ भादीव ४५७.३८०
७४१/२०२३ भादंवि ३९५
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. पंकज देशमुख, सो, पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. एस.डी.पी.ओ. श्री प्रशांत डोले, शिरूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पो.नि. रतनदिप गायकवाड, स्था.गु.शा.चे सपोनि राहुल गावडे, कुलदीप संकपाळ, योगेश लंगुटे, अमित सिदपाटील, शिक्रापूर पो स्टे थे सपोनि केशव वाबळे, सतिश पवार, पोसई महेश डोंगरे, स्थागुशा कडील अंमलदार बाळासाहेब कारंडे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजु मोमोण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, स्वप्निल अहोवळे, अभिजीत एकशिंगे, संजू जाधव, योगेश नागरगोजे, दिपक साबळे, विक्रम तापकीर, विजय कांचन, आसिफ शेख, राहुल युबे, धिरज जाधव, अक्षय नवले, सागर धुमाळ, संदिप वारे, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, काशिनाथ राजापूरे, शिक्रापूर पो स्टे कडील अंमलदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, रोहीदास पारखे, विकास पाटील, निखोल रावडे, यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com