पुण्यात पिस्तूल बाळगणाऱ्या ३ जणांना सिंहगड रोड पोलीसांनी ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :– पुणे : बेकायदेशीररित्या पिस्तूल व जिवंत काडतूस बाळगणाऱ्या ३ इसमांना बेड्या ठोकण्यात आल्या . ही कारवाई रायकरमळा धायरी येथे सिंहगड रोड पोलिसांनी केली. कारवाईदरम्यान आरोपींकडून १ देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व २ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आले.
सिंहगडरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, व पोलीस पथक गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस उप-निरीक्षक निकेतन निंबाळकर यांना पिस्तूल बाळगणाऱ्यांची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार पोलिसांनी रायकरमळा, ढिगारा, धायरी पुणे येथे सापळा लावला. पोलीस आल्याचे लक्षात येताच त्यांनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता ५० हजार रुपयांचे देशी बनावटीचे एक पिस्टल, व ५०० रुपयांचे दोन जीवंत काडतुसे असा एकुण ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीदरम्यान या आरोपींने स्वत:ची नावे नामदेव रामभाऊ ढेबे (वय-२२ वर्षे रा. सम्राट बाजारच्या शेजारील लेन, रायकरमळा धायरी पुणे), आकाश मच्छिद्र कदम (वय २३ वर्षे रा. लोणारे वस्ती, धायरी पुणे), जय संगमेश्वर दयाडे (वय- १९ वर्षे रा. रायकरमळा धायरी पुणे) अशी सांगितली.
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उप-आयुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार, सचिन गायकवाड, प्रकाश पाटील, राजु वेगरे, स्वप्निल मगर, विनायक मोहिते, मोहन मिसाळ, विजय विरणक योगेश उदमले यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com