ईद व गणेशोस्तव मिरवणुकी दरम्यान, उल्लंघन करणाऱ्या डी. जे. धारकांवर गोरेगाव पोलसांची दंडात्मक कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया:

  🪷 याबाबत थोडक्यात माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यात ईद व गणेश उत्सव शांततापूर्ण  वातावरणात कायदा सुव्यवस्था राखून आपसी सामंजस्य सौहार्दपूर्ण उत्सव साजरा करण्याचे गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासन तर्फे जिल्ह्यांतील सर्व जनतेला आवाहन करण्यात आले आहे.

             मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किशोर पर्वते यांनी उत्सव दरम्यान कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मिरवणुकी दरम्यान गाडीचे स्वरूप बदलवून उल्लंघन करणाऱ्या dj धारकांवर, वाजवीणाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. 

            त्या अनुषंगाने मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश आदेशानुसार गोरेगाव पोलीस स्टेशन चे पोलीस निरिक्षक अजय भुसारी यांचे नेतृत्वात गोरेगाव येथे गाडीचे स्वरूप बदलवून मोठे dj लावणाऱ्या 2 dj धारक नामें -- 

1) पियाल मस्करे
2) प्रेमलाल नाईक दोन्ही* रा गोरेगाव* यांचेवर दंडात्मक कारवाई केली आहे.

       सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे निर्देश व आदेशाप्रमाणे पो.नि. भुसारी ,सपोनि गोसावी पोलिस अंमलदार पोहवा सोनवणे, येळे महिला नपोका वैध्य. यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट