पुणे युनिट ६ गुन्हे शाखा यानकडी.पी मधील तांब्याच्या तारा चोरणारी आंतराज्यीय टोळी केली जेरबंद..

0
Spread the love

पुणे

सह संपादक- रणजित मस्के

 लोणीकंद व वाघोली पोलीस ठाणे हददीत विदयुत रोहीत्र (डी.पी.) मधील तांब्याच्या तारा चोरीच्या गुन्हयांमध्ये सतत वाढ होत असल्याने वरिष्ठांकडुन सदरचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित करण्यात आले होते. त्याप्रमाणे लोणीकंद पोलीस स्टेशन गु.र.क्र. ६७७/२०२४, कलम १३६ भारतीय विदयुत कायदा सह कलम ३२४ (३) भा.न्या.सं. हया गुन्हयाचा पुढील तपास युनिट ६, गुन्हे शाखा येथे वर्ग करुन समांतर तपास करण्यात येत होता.

सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान पोलीस अंमलदार तनपुरे, युनिट ६, गुन्हे शाखा यांना मिळालेल्या गोपनीय माहीती व तांत्रिक तपासाच्या आधारावर युनिट ६. गुन्हे शाखा पथकाने खालील नमुद आरोपी अटककेले आहेत.

१) अबरार बिलाल अहमद, वय २४ वर्षे, रा. जमुनी, ता. बांसी, जिल्हा. सिध्दार्थनगर, उत्तर प्रदेश

२) आफताबनियामतउल्ला खान, वय ३२ वर्षे, रा. बोरीगाव, शंकर मंदीराजवळ, उरण, नवी मुंबई

३) नफीज हमीद अब्दुल, वय २३ वर्षे, मुळ रा. जमुनी, ता. बांसी, जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुरी, ता. शिरुर, जि. पुणे यांनी लोणीकंद ता. हवेली जि.पुणे

४) मोबीन हमीद अब्दुल, मुळ रा. जि. सिद्धार्थनगर, उत्तरप्रदेश, सध्या रा. कोंढापुर ता. शिरुर जि. पुणे

 वर नमुद अटक आरोपीतां कडुन खालील एकुण १२ गुन्हे उघडकीस आणुन त्यामधील खालील प्रमाणे एकुण १०,४२, २६०/- रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे)। श्री. निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. राजेंद्र मुळीक यांचे मार्गदर्शनाखाली युनिट ०६चे पोलीस निरीक्षक श्री. वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस अंमलदार बाळासाहेब सकटे, नितिन मुंडे, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, शेखर काटे महिला पोलीस अंमलदार प्रतिक्षा पानसरे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट