पुणे ताम्हणी घाटात स्वताच्या भावाचा खून करणारा आरोपी भाऊ अनिकेत शिर्के अखेरवारजे माळवाडी पोलीसांच्या जाळ्यात ..

सह संपादक -रणजित मस्के
पुणे
पुणे शहर ताम्हीणी घाटातील बेवारस मयताच्या खुनाची उकल करून आरोपीस पोलीसांनी कसे घेतले ताब्यात पहा..
दि.२६/०७/२०२५ रोजी वारजे माळवाडी पोलीस स्टेशन अंकित कर्वेनगर पोलीस चौकी येथे पोलीस उप-निरीक्षक सचिन तरडे हे कर्तव्यावर असताना त्यांना गोपनीय बातमीदारा मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, 'कर्वेनगर मधील इसम नामे अनिकेत अनिल शिर्के याने त्याच्या सख्या भावाला ताम्हीणी घाटात मारुन टाकून दिले आहे अशी माहीती मिळताच पोलीस उप निरीक्षक सचिन तरडे, पोलीस अंमलदार गागुर्डे, कपाटे, नेवसे व ओव्हाळ असे सर्वांनी त्याचा सर्व स्तरावरती शोध सुरु केला. शोध पथकाला सदरचा इसम कर्वेनगर मधील वनदेवीच्या मागील टेकडीच्या परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोउपनि सचिन तरडे व वरील पोलीस स्टाफ यांनी सदर ठिकाणी जावून सदर इसमास ताब्यात घेवून कर्वेनगर पोलीस चौकी येथे आणले.
त्यानंतर बातमीच्या अनुषंगाने त्याचेकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव अनिकेत अनिल शिर्के, वय २६ वर्षे, रा. गायकवाड चाळ, मावळेआळी, कर्वेनगर, पुणे असे असल्याचे सांगितले. तसेच त्याने सांगितले की, तो व त्याचा सख्या भाऊ ऋषीकेश अनिल शिर्के, वय २३ वर्षे असे दोघेजण दि.२५/०७/२०२५ रोजी २१/०० वा. चे सुमारास कर्वेनगर मधून त्यांचे मुळगाव मौजे गोळवशी-शिर्केवाडी ता. तांजा जि. रत्नागिरी येथील देवाच्या दर्शनासाठी त्यांचे दुचाकीवरुन निघाले होते. दि.२६/०७/२०२५ रोजी ००/१० वा. चे सुमारास ते दोघे ताम्हीणी घाटातील मौजे गोणवडी ता. मुळशी जि. पुणे येथे रोडच्या कडेला बांबले. त्याठिकाणी ते दोघे आपासात बोलत बसले होते. ऋषीकेश शिर्के यास दारु व गांज्याचे असलेले व्यसन सोडण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्या वादातून पहाटे ०३/०० वा. चे सुमारास अनिकेत याने ऋषीकेश याचेवर लोखंडी हत्याराने वार केले. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याने तो तेथून पळून आल्याचे चौकशी दरम्यान अनिकेत शिर्के याने सांगितले.

त्यानंतर लगेव पोलीस उप-निरीक्षक सचिन तरडे यांनी सदरची सर्व हकिकत वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश चेंडे यांना फोनद्वारे कळविली. त्यांनी लगेच फोनद्वारे पौड पोलीस ठाणे, पुणे ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीगोसावी यांना माहीती कळविली. त्यानंतर श्री गिरीगोसावी यांनी श्री. प्रकाश चेंडे यांना सांगीतले की, त्यांच्या पोलीस वाण्याच्या हद्दीतील ताम्हीणी घाटातील गोणवडी गावच्या हद्दीत एक अनोळखी पुरुषाची मयत बॉडी मिळून आली असून त्याची ओळख पटवण्याची तसेच पुढील कायदेशीर कारवाई चालू असल्याचे सांगीतले. त्यानंतर बेवारस बॉडीचा व त्याचे नातेवाईकांचा शोध होणे करीता पौड पोलीस ठाणे कढील तपास यादी शोध पथकाने प्राप्त केली. त्यातील मयताचा फोटो वारजे माळवाडी पोलीसांच्या ताब्यात असलेला इसम नामे अनिकेत शिर्के यास दाखविला असता त्याने सदरची मयत बॉडी ही त्याचा सख्खा भाऊ ऋषीकेश शिर्के याची असल्याची सांगुन त्यानेच त्याचा खुन केला असल्याचे सांगीतले. त्यानंतर पौड पोलीसांशी समन्वय साधून सदरच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी नामे अनिकेत अनिल शिर्के यास पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पौड पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास पौड पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई ही ना. अपर पोलीस आयुक्त, पश्विन प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री. राजेश बनसोडे मा. पोलीस उप-आयुक्त, परि.३ पुणे शहर श्री. संभाजी कदम, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त कोथरूड विभाग पुणे श्री. भाऊसाहेब पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रकाश धेंडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री निलेश बडाख यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक सचिन तरडे, पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार नागुंडे, कपाटे, नेवसे व ओव्हाळ यांनी केली आहे.