पुणे शहरातुन दुचाकी चोरणा-या अट्टल वाहन चोरास हडपसर पोलीसांकडून अटक…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :-मा.पोलीस आयुक्त साो पुणे शहर यांनी पुणे शहरात वाहन चोरीचे गुन्ह्याचे प्रमाण वाढत असल्याने, त्याबावत कारवाई करणेबाबत सुचना दिल्या होत्या, तसेच मा. आर राजा सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांनी देखील हडपसर पोलीस ठाणे येथे अधिकारी यांची बैठक घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या. वरीष्ठांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, यांनी तपास पथक अधिकारी / अंमलदार यांची मिटींग घेवून वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी आराखडा तयार केला.

त्यानुसार तपासपथक अधिकारी अर्जुन कुदळे, सहा पोलीस निरीक्षक, महेश कवळे, पोलीस उप निरीक्षक, पोलीस अंमलदार दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड, अजित मदने, कुंडलीक केसकर असे पोलीस ठाणे हद्दीत वाहनचोरी प्रतिबंधक पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार दिपक कांचळे आणि चंद्रकांत रेजितवाड यांना मिळालेल्या गोपनिय बातमीवरून आरोपी नामे दिपक उर्फ ओजो बाबुराव सरवदे वय ३० रा. थोरात वस्ती, द्वारका मेडीकल समोर कोलबडी रोड मांजरी पुणे यास ताब्यात घेवून त्याचे कडे केले तपासात त्याने मांजरी, मुंढवा, लोणीकाळभोर, लोणीकंद, या भागातून वेळोवेळी दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचेवर यापूर्वी पुणे शहरात मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

आरोपी नामे दिपक उर्फ जोजो बाबुराव सरवदे वय ३० रा. थोरात वस्ती, द्वारका मेडीकल समोर कोलवडी रोड मांजरी पुणे याचा मागिल काही महिन्यापासून हडपसर तपासपथक हे शोध घेत होते परंतु तो मिळून येत नव्हता. आरोपी चे ठावठिकाण्याचाचत खात्रीलायक माहीती प्राप्त करून त्यास ताब्यात घेतले. आरोपीस हडपसर पोलीस ठाणे गु.र.नं १००/२०२४ भा.दं. वि. कलम ३७९ या गुन्ह्यात अटक करून त्यास मा. न्यायालयात हजर करून त्याची दिनांक ०५/०१/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली आहे.

आरोपीकडून आज रोजी पर्यंत एकुण २४ गुन्हे उघडकीस झाले असून किं.रु १२,५०,०००/- चा माल जप्त केला आहे. त्यामध्ये ०९ होंडा शाईन, ४ हिरोहोंडा पेंशन, ४ स्पलेंन्डर, २ हिरो होंडा डिलक्स, २ अॅक्टीव्हा, अॅकॅनजर, १ होंडा डिओ, १ होंडा ड्रिमयुगा, अशा २४ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. नमुद दुचाकी या पुणे शहर, धाराशिव आणि लातुर या ठिकाणाहून हस्तगत करण्यात आल्या आहेत

हडपसर पोलीस स्टेशन १९, मुंढवा पो. स्टे ०२. लोणीकंद पो.स्टे ०२, आणि लोणीकाळभोर पो.स्टे ०१ असे एकूण २४ गुन्हे उघडकीस आलेले आहेत
सदरची कामगिरी ही मा. श्री. अमितेश कुमार, पोलीस आयुक्त सो पुणे शहर, मा. श्री. रंजन कुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त साो. पुणे शहर, मा. श्री. मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त साो, पूर्व प्रादेशिक विभाग, मा. श्री. आर राजा, पोलीस उप आयुक्त साो., परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. अश्विनी राख मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, संतोष पांढरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, निलेश जगदाळे, पोनि, (गुन्हे), यांचे सूचनांप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कदळे, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, पोलीस अंमलदार, दिपक कांबळे, चंद्रकांत रेजितवाड सुशील लोणकर, संदीप राठोड, जोतीबा पवार, समीर पांडुळे, सचिन जाधव, निलेश किरवे, प्रशांत दुधाळ, निखील पवार, भगवान हंबर्डे, अजित मदने, अतुल पंधरकर, अमित साखरे, अमोल दणके, कुंडलीक केसकर, तुकाराम झुंजार, अभिजीत राऊत, यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट