पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकांने रांजणगाव MIDC मधून बेकायदा वास्तव्य करणाऱ्या २१ बांगलादेशीना घेतले ताब्यात..

प्रतिनिधी- मारुती गोरे
पुणे : – दि.२२:-रांजणगाव पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये दहशतवाद विरोधी शाखा व रांजणगाव पोलिस स्टेशन यांची संयुक्त कारवाई
दिनांक 21 ऑक्टोंबर रोजी दहशतवाद विरोधी शाखा पुणे ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार हे आपल्या पथकांसह रांजणगाव पोलीस स्टेशन परिसरांमध्ये पेट्रोलिंग करीत असताना त्यांचे पथकांतील सहा पोलीस उपनिरीक्षक विशाल गव्हाणे ह्यांना गोपनीय माहिती मिळाली की रांजणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कारेगावच्या परिसरात काही बांगलादेशी इसम रहात असल्याची अशी माहिती मिळाली होती.


सदर मिळालेल्या माहितीवरून पथकांने पंकज देशमुख पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये रांजणगाव पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्या स्टाफसह कारेगाव येथून 15 पुरुष व 04 महिला तसेच 02 तृतीयपंथी असे 21 जण ताब्यात घेण्यात आले आहेत.
या प्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर बाबत अधिक पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले उपविभागीय पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर महादेव वाघमोडे पोलीस निरीक्षक रांजणगाव पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शना खाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहा पोलीस उपनिरीक्षक विशाल गव्हाणे, पो.हवा विशाल भोरडे, पो.हवा रवींद्र जाधव, पो.कॉ मोसीन शेख ब.नं 2968, पो.कॉ ओंकार शिंदे ब.नं 3006, तसेच रांजणगाव पोलीस स्टेशन चे पोसई. अविनाश थोरात, सहा. फौजदार डी.आर.शिंदे पो.हवा/1631 व्ही.व्ही. सरजीरे, पोकॅा/2817 उमेश कुतवळ यांच्या पथकांने केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com