पुणे रेल्वे स्टेशन, एस.टी.स्टॅन्ड, ससून हाॅसपिटल, पी.एम टी.स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणी चोरीस गेलेले मोबाईल बंडगार्डन पोलीसांनी केले परत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :- पुणे रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड, ससुन हॉस्पिटल, पी.एम.टी स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणाहुन चोरी झालेल्या तब्बल ५१ मोबाईलचा शोध बंडगार्डन पोलिसांकडून लावण्यात आला आहे. CEIR (Central Equitpement Indentity Register) चे ऑनलाईन वेबसाईटवर प्राप्त तक्रारीवरून पुणे पोलिसांनी प्रभावी तपास केला आहे.

यावेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ-२ स्मार्तना पाटील यांच्याहस्ते २१ हस्तगत मोबाईल तक्रारदाराना सुपूर्द करण्यात आले.

CEIR (Central Equitpement Indentity Register) चे ऑनलाईन वेबसाईटवर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने अमितेष कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे आदेशान्वये व वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली सदर गहाळ मोबाईलचा बंडगार्डन पोलीस स्टेशन कडील सायबर पथकाचे पोलीस उप निरीक्षक परमेश्वर गर्कळ, पोलीस नाईक विष्णु सरवदे, पोअं सागर घोरपडे व पोअं निलेश पालवे यांनी करुन लोकांचे गहाळ झालेले मोबाईल फोन यांचे आयएमईआय नंबर वरुन त्यांचा एसडीआर तसेच लोकेशन यांचेव्दारे शोध घेवून सदर गहाळ मोबाईल पैकी आज पावतो अंदाजे ५ लाख किंमतीचे एकुण ५१ मोवाईल फोन हस्तगत केले.

सदरची कामगीरी अमितेष कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, श्रीमती स्मार्तना पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ २. पुणे, दिपक निकम, सहा. पोलीस आयुक्त, लष्कर विभाग, पुणे शहर व बंडगार्डन पोलीस स्टेशनचे व.पो.नि. रविद्र गायकवाड, पो.नि. गुन्हे संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनिरी परमेश्वर गर्कळ, पोना विष्णु सरवदे, पोअं सागर घोरपडे, पोअं निलेश पालवे, पोअं शशांक खाडे, पोअं प्रसाद पवार, पोअं ज्ञानेश्वर गायकवाड, पोअं विशाल जाधव यांचे पथकाने केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट