टपरीचे दुकान फोडून पळणाऱ्या आरोपीचा पाठलाग करून पुणे पोलीसांनी ठोकल्या बेड्या…

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :- धानोरी मार्शल पो.शि /8723 काची व पो. शी/11167 काकडे यांच्यासह ड्युटीवर असताना नियंत्रण कक्षा 112 वर कॉल प्राप्त झाला तीन इसम आदित्य हॉटेल प्रिया वसंत सिटी येथे टपरी चे दुकान फोडत आहे वरील खबर नुसार मिळाल्यावर सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता टपरीचे दुकान फोडलेले होते.


कॉलर यांना फोन केले असता तिन् इसम लोहगाव रोड नि पळून गेलेले आहे. पोलीसानी तात्काळ त्यांचा पाठलाग केला असता गोल चौक येथे तीन इसम एक्टिवा गाडी जोरात लोहगाव दिशेने जात होते थांबण्याचा इशारा केला.
तरी ते पळून जात होते. पोलीसानी पाठलाग करून त्यांच्या गाडीच्या पुढे गाडी आडवी लावून त्यांना थांबवले त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल मिळून आला लागलीच रात्रगस्ती पीएसआय गंपले सर व ठाणे अंमलदार विश्रांतवाडी पो.स्टे माळी यांना फोन द्वारे खबर दिली.
पीएसआय गंपले सर तात्काळ घटनास्थळी येऊन व सी आर मोबाईल मधून तिन्ही आरोपींना व मुद्द्यामालासह पोलीस स्टेशन येथे आणले सविस्तर चौकशी नंतर तिन्ही आरोपींनी गुन्हा मान्य केलेला आहे. त्याप्रमाणे सी आर नंबर 276/2024 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com