पुणे स्था. गुन्हे शाखेनेजुन्नर व आंबेगाव तालुक्यातील मंदिरात चोरी करणारा सराईत केला जेरबंद..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

चार मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एक किलो ग्रॅम चांदी व अडीच ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण १,५०,०००/- किं. चा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे.

जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात मंदिर चोरीचे गुन्हयांमध्ये अचानक वाढ झाली होती. यामध्ये आळेफाटा, ओतूर, मंचर, पारगाव पोलीस स्टेशन हद्दीत मंदिर चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. सदरचे गुन्हे उघडकीस आणण्याचे अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक साो पुणे ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सुचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी मार्गदर्शन करून जुन्नर विभागात गुन्हे प्रकटीकरणाचे काम पाहणारे पथकास नेमले होते.

आळेफाटा पो स्टे गुरनं ११७/२०२५ BNS ३०५(A), ३३१ (४) प्रमाणे दि.२९/०४/२०२५ रोजी दाखल गुन्हयाचा सर्मातर तपास स्थागुशा चे पथकाने सुरू केला असता, सदर गुन्हयाचे व इतर सर्व गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सर्व मंदिर चोरी मध्ये एकच व्यक्ती असल्याचे निष्पन्न झाले. आळेफाटा, मंचर, पारगाव पो स्टे हद्दीतील मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एकाच वर्णनाचे कपडे परिधान केलेला चोरटा आढळून आला, सदर सीसीटीव्ही फुटेज मधील संशयित आरोपीचे फुटेज गोपनीय बातमीदारांना दाखविण्यात आले. सदरचा संशयित हा संतोष एकनाथ बर्ड असून तो अकलापूर संगमनेर येथील राहणार आहे. तसेच तो फिरस्ता असून मिळेल त्या ठिकाणी मजूरी काम करतो. मिळालेल्या बातमीचे आधारे तपास सुरू केला असता, आरोपी हा अकलापूर येथे मिळून आला नाही. त्याचा जुन्नर तालुका परिसरात शोध घेत असताना दि. ३०/०४/२०२५ रोजी स्थागुशाचे पथक सदर संशयिताचा शोध घेत असताना तो आळेफाटा परिसरात आला असल्याची बातमी मिळाली. बातमीचे आधारे सापळा लावून पथकाने आरोपी संतोष एकनाथ बड़े वय ५० वर्षे रा. अकलापूर ता. संगमनेर जि अहिल्यानगर यास ताब्यात घेतले. त्याचेकडे चौकशी करता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवन् तपास केला असता त्याने घोलवड, लौकी, धामणी गावातील मंदिरामध्ये चोरी केली असल्याचे सांगितले असून आरोपीने एकूण चार गुन्हे केल्याचे सांगितले आहे. त्याचेकडून चोरी केलेले ०१ किलो ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण १,५०,०००/- किं.चा. मुद्देमाल हस्तगत केला आहे.

उघडकीस आलेले गुन्हे

११७/२०२५ BNS ३०५(A), ३३१(४) ३

५८/२०२५ BNS ३०५(A)

६७/२०२५ BNS ३३१(३), ३३१

४०/२०२५ BNS ३०५(a), ३३१

नागरीकांचे श्रद्धास्थान असणारे मंदिरामध्ये चोरी झाल्याने नागरीकांमध्ये नाराजी होती, चोरीच्या घटना चिंतेचा विषय झालेला असल्याने मा पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष देवून वेळोवेळी मार्गदर्शन व सुचना केल्याने मंदिर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

मंदिर प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील वस्तीतील मंदिरांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, तसेच मंदिरातील दागिन्यांचे सुरक्षेबाबत योग्य उपाययोजना करणेबाबत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी आवाहन केले आहे.

सदरची कामगिरी मा पोलीस अधीक्षक श्री पंकज देशमुख साो पुणे ग्रामीण, मा अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे सो पुणे विभाग, मा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रविद्रकुमार चौधर सो जुन्नर विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अमोल मांडवे, खेड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे मा. पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पो स्टे चे पो नि दिनेश तायडे, स्थागुशाचे अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, राजु मोमोण, अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सुपेकर, यांनी केली असून पुढील तपास आळेफाटा पो स्टे करत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट