पुणे लोहमार्ग पोलीसांनी जप्त केलेले एकूण ३८४ किलो ३१२ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ केला नाश

सह संपादक – रणजित मस्के
पुणे

पुणे लोहमार्ग जिल्हयातील पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे, दौंड लोहमार्ग पोलीस ठाणे, कुईवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे, सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे व मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे असे ०५ पोलीस ठाणे अंतर्गत सन १९८१ ते अद्यापपर्यंत अंमली पदार्थ कारवाई मध्ये, एकूण १५ केसेस मधील ३८४ किलो २६२ ग्रॅम वजनाचे गांजा, ५० ग्रॅम चरस नावाचे अंमली पदार्थ जप्त मुदेदमाल मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, लोहमार्ग न्यायालय पुणे, दौंड व मिरज यांनी इन्व्हेंट्री पूर्ण केलेल्या कार्यवाही नंतर एकूण ३८४ किलो २६२ ग्रॅम गांजा व ५० ग्रॅम चरस एकूण किमंत ६ लाख ६० हजार ९७६ रुपये किंमतीचा अंमली पदार्थ रासायनिक विश्लेषण, तज्ज्ञ अधिकारी पुणे, महाराष्ट्र राज्य प्रदुषण महामंडळ कडील अधिकारी, शासकीय वजन व मापन कडील अधिकारी यांचेसह व राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांचे कडील दोन अधिकारी पंचासमक्ष पुणे लोहमार्ग जिल्हयाचे मा. पोलीस अधीक्षक, तथा अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष श्री. तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक श्री. रोहिदास पवार, पोलीस उपअधीक्षक (गृह) अतिरिक्त कार्यभार इरफान शेख या समितीने मुख्यालय खडकी येथे पंचनामा वजन व ईन्व्हेंट्री वजन करून तो अंमली पदार्थ मुद्देमाल महाराष्ट्र इन्व्हायरो प्रा. लि. या कंपनीमध्ये छोट्या १५ बॅग करून भट्टी (Rotary incinator) मध्ये कोळसा व विजेरी किरणांच्या सहाय्याने जाळुन नाश करण्यात आला सदर वेळी पुणे, दौंड, कुडुवाडी, सोलापूर व मिरज लोहमार्ग पोलीस ठाणे दुय्यम अधिकरी स.पो.नि. मच्छिंद्रनाथ गुरव, पो. उपनिरीक्षक रविंद्र भिडे, आरिफ सयद, विनोद घाटे व शरद देसाई व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी / पोलीस अंमलदार हजर होते. या पथकाने सदरची कार्यवाही केली असून सदरची कार्यवाही करीता एकूण ०९ तास १५ मिनिटाचा कालावधी लागला आहे.