पुणे गुन्हे शाखा युनिट ६ कडुन घरफोडी व वाहन चोरी करणारी बारक्या टोळी केली जेरबंद..

सह संपादक – रणजित मस्के
पुणे ;मा. वरिष्ठांचे आदेशान्वये घरफोडी व वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेकामी युनिट ६ कडून सतत प्रयत्न सुरू असताना युनिट ६ कडील अंमलदार पो. हवा. नितीन मुंढे आणि पो. हवा. कानिफनाथ कारखेले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व पो.अं. समीर पिलाने यांनी केलेल्या तांत्रिक विश्लेषणाचे आधारे खालील आरोपींना ताब्यात घेवून गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत.आरोपींचा तपशिल१) पृथ्वीराज ऊर्फ साहील संतोष आव्हाड वय १९ वर्षे, रा. हडपसर गंगानगर, फुरसुंगी पुणे२) आनंद उत्तरेश्वर लोंढे वय ३४ वर्षे धंदा, रिक्षाचालक रा. कामठे वस्ती, राजगे आळी हडपसर गाडीतळ पुणे३) आर्यन कैलास आगलावे, वय १८ वर्षे, धंदा मजुरी, रा. कात्रज कोंढवा रोड, गोकुळनगर,कात्रज, पुणे४) कुलदीप गणपत सोनवणे, वय १९ वर्षे, रा. शेवाळवाडी, हडपसर, पुणे५) एक विधी संघर्षित बालक, वय १७ वर्षेउघडकीस आणलेले गुन्हे-१) अलंकार पो.स्टे. गु.र.क्र. ४०/२५, भा. न्या. सं. ३३१ (४), ३०५२) चतुशिंगी (बाणेर) पो.स्टे. गु.र.क्र. १००५/२०२४ भा. न्या. सं. ३३१ (३) (४),३०५ (१)३) हडपसर पो.स्टे. गु.र.क्र. २९६/२५, भा. न्या.सं. कलम ३०३-(२)४) हडपसर पो.स्टे. ग.र.क्र. २६८/२५, भा. न्या.सं. कलम ३०३(२)५) हडपसर पो.स्टे.गु.र.क्र.१५२/२५, भा. न्या. संहिता कलम ३०३ (२)६) लोणीकंद पो.स्टे.गु.र.क्र.७३/२५, भा.न्या.सं. कलम ३०३ (२)हस्तगत मुद्देमाल -१) वेगवेगळ्या वर्णनाचे सोन्याचे दागिणे व सोन्याची लगड एकुण १२९ ग्रॅम तसेच २ किलो वजनाच्या चांदीच्या विटा एकुण किं. रू.११,९१,९२०/-२) वेगवेगळ्या कंपनीच्या ४ मोटार सायकल एकुण किं. रू. २,४०,०००/-अशा प्रकारे एकूण ४ मो/वाहन चोरीचे गुन्हे व २ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण १४.३१,९२०/- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी व मुद्देमाल संबंधित पो.स्टे. च्या ताब्यात देण्यात आला आहे.सदरची कामगीरी मा. अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री शैलेश बलकवडे, मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री निखिल पिंगळे, मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे २) श्री राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस उप निरीक्षक रामकृष्ण दळवी, पो. हवा. बाळासाहेब सकटे, रमेश मेमाणे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, सुहास तांबेकर, पो. अं. ऋषीकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, गणेश डोंगरे, समीर पिलाने, नितीन धाडगे, बाळासाहेब तनपुरे, मपोअं. प्रतिक्षा पानसरे, किर्ती मांदळे यांनी केली आहे.