युगा फाऊंडेशन आणि पुणेकर प्रतु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व लय भारी पुणेरी यांच्या सहकार्याने पुणे गौरव पुरस्कार 2023 मोठ्या उत्साहात संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे :
युगा फाउंडेशन आणि पुणेकर प्रतू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने व लय भारी पुणेरी यांच्या सहकार्याने पुणे गौरव पुरस्कार 2023 हा कार्यक्रम 29 जुलै 2023 रोजी अण्णाभाऊ साठे या ठिकाणी बऱ्याच मोठ्या जल्लोषामध्ये पार पडला.
या कार्यक्रमात बरेच मान्यवर उपस्थित होते जसे की अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले व एसीपी रुक्मिणी ताई गलांडे , तृप्ती ताई देसाई,डॉ.आदित्य पतकराव दिपाली ताई पांढरे , विशाखा ताई गायकवाड,सुनिल हिरूरकर ,सोनाली ताई दळवी ,शशिकांत कांबळे, जोएल मेकेंजी, त्याचबरोबर सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील बरेच मोठ्या व्यक्तींनी उपस्थिती दाखवली.


या कार्यक्रमात सेलिब्रिटी गेस्ट म्हणुन रोशनी कपूर यांनी सुद्धा उपस्थिती दाखवली व कार्यक्रमाचे कौतुक केले.
पुणे गौरव पुरस्कार हा सोहळा घेण्याचे तात्पऱ्य असे होते .
केलेल्या कामाचे कौतुक करणे शाबासकीची थाप मिळणे जेणेकरून पुढील कार्यासाठी त्त्यांना प्रोत्साहन मिळू शकते. केलेल्या कामाचे कौतुक नेहमीच करायला हवे त्यामुळे काय होतं आपल्याला आणखी प्रोत्साहन मिळतं आणि आपण आणखीन जोमाने काम करू शकतो म्हणून यामिनी सचिन खवले व प्रतिक शुक्ल यांनी हा पुणे गौरव पुरस्कार सोहळा घेण्याचं ठरवलं आणि बऱ्याच क्षेत्रातील मान्यवर मंडळींना तेथे पुणे गौरव पुरस्कार देऊन त्यांचं कौतुक केलं व त्यांना त्यांच्या पुढील कामासाठी तेथे शुभेच्छा दिल्या.
पुरस्कार मिळालेले मान्यवर व्यक्तिमत्वमधये अभिनय क्षेत्रातील माधव अभ्यंकर , अमित भानुशाली , मिरा जगन्नाथ, मिरा जोशी , सचिन गवळी , सचिन दानाई, रश्मी दहिरे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे आपण त्यांना पुणे गौरव पुरस्काराने सन्मानित केले.
हेल्थ केअर क्षेत्रातील मुख्यमंत्री सहायता निधी चे मूळ संकल्पणा तथा कक्ष प्रमुख मंगेश चिवटे ह्यांना आपण पुरस्कार दिला,
सोशल मीडिया क्षेत्रातील पुरस्कार सोनिया कोंजेती ज्यांनी पहिला फेसबुक ग्रुप महिलांसाठी सुरू केला व त्यामार्फत महिलांना एकत्रित आणून महिलांना सक्षम बनविण्यासाठी मदत केली त्यांना दिला.पत्रकार क्षेत्रातील पुरस्कार राजेंद्र हूंजे, तसेच संगीत क्षेत्रात
गायक मंगेश बोरगावकर यांना ही आम्ही पुणे गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले.
त्यांच्या आवाजाच्या जादू मधे पुणेच काय तर अख्खं महाराष्ट्र दिवाण आहे .खूप कष्ट घेऊन नृत्य क्षेत्रातून प्रसिद्धी मिळवलेली गौतमी पाटील हिला सुद्धा आम्ही पुणे गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
हेल्थ केअर क्षेत्रांतील डॉ.रोहन खावटे ,डॉ. शुभांगी डोळे , श्री.केदार देव व पत्नी अदिती ताई ह्यांना देखील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सामाजिक क्षेत्रातील संतोश डिंबळे, किरण गोसावी,अनुषा श्रीनिवासन अय्यर, उद्योजिका क्षेत्रांतील डॉ.नितेश घोडके,अविनाश दिघे,अतुल गुंजाळ,सीमा फर्नांडीस,मोनिका,रेणुका आशिष, पल्लवी चोपडे, श्वेता प, नेहा कदम,
तसेच लेखक अभिषेक विचारे यांना सुद्धा त्याचा सुंदर लेखणी साठी पुणे गौरव पुरस्कार देण्यात आला.
पुणे गौरव पुरस्कार सोहळ्या सोबतच यामिनी खवले यांनी ट्रॅडिशनल स्पारकलस फॅशन वॉक आणि स्पारकलिंग अचिवरस अवॉर्ड सुध्दा देण्यात आले .
सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ठ काम करणाऱ्या महिलांना आपण रॅम्प वर चालण्याची संधी दिली . ट्रॅडिशनल स्पार्कलस वॉक हा पुर्ण पणे सोशल वॉक होता .शो चे डायरेक्शन सॅम चर्चिल यांनी केले.
स्पार्कलिंग आचीवरस अवॉर्ड देऊन आपण बऱ्याच मान्यवरांचे तिथे कौतुक केले.
योगेश पवार,रुपाली वांबुरे, दिप्ती शाह, सीमा फर्नांडीस, आरती शिंदे,शीतल परमार . कार्यक्रमास RJ बंड्या व रश्मी कालसेकर यांचे विशेष सहकार्य लाभले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com