पुणे शहर वाहतूक शाखेने १७६८ बुलेट कर्कश सायलेन्सरवर कसा फिरवला बुलडोझर पहा..

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे :पुणे शहर वाहतूक शाखेकडुन बुलेट मॉडिफाय सायलेन्सर च्या कर्कष आवाजावर सर्जिकल स्ट्राईक करून “बुलेट सायलेन्सर विशेष मोहिमे” अंतर्गत सुमारे १७६८ बुलेट मॉडिफाय सायलेन्सरवर बुलडोझर फिरवला आहे.मा. पोलीस आयुक्त, श्री अमितेश कुमार यांनी दिलेल्या आदेशाने व मा. सह पोलीस आयुक्त, श्री रंजनकुमार शर्मा व मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग श्री मनोज पाटिल यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहर वाहतूक शाखेकडून बुलेट मॉडिफाय सायलेन्सर च्या कर्कष आवाजावर सर्जिकल स्ट्राईक करून “बुलेट सायलेन्सर विशेष मोहिमे अंतर्गत कारवाई केलेल्या १७६८ मॉडिफाय सायलेन्सर जप्त करून त्यावर रोड रोलर फिरविण्यात आला आहे.पुणे शहरातील बेशिस्त नागरिकांकडुन वाहतूकीचे नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रकारांमध्ये बुलेट, दुचाकी वाहनास असलेल्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून अथवा नवीन मॉडीफाय केलेला सायलेन्सर बसवुन सार्वजनिक रस्त्यावर, रहिवाशी भागात दिवसा / रात्री कर्कश आवाज करत भरधाव वेगाने बुलेट चालवून लोकांचे लक्ष वेधुन घेण्याचे प्रकार तरूणांमध्ये वाढत असल्याने त्यामुळे या कर्कश आवाजाने जेष्ठ नागरिक, महिला, शांतताप्रिय नागरिकांना त्रास होत होता. याबाबतच्या अनेक तक्रारी नागरिकाकडुन प्राप्त झाल्याने अशा बेकायदेशीर सायलेन्सर बसविलेल्या दुचाकी वाहनांवर कठोर कारवाई करण्याबाबत सुचना मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी दिल्या होत्या त्यानुसार वाहतूक शाखेकडील सर्व विभागांकडुन मोहिम राबविण्यात आली होती. तसेच बुलेट सायलेन्सर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असुन सायलेन्सर विक्री करणाऱ्या व बसविणाऱ्या गैरेज मालिकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट