पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडुन संपुर्ण शहरात प्रभावी नाकाबंदीचे आयोजन

सह संपादक- रणजित मस्के
पुणे
दि.२४/०२/२०२५ रोजी पुणे शहर पोलीस दलाकडुन संपुर्ण पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन कडील महत्वाचे रस्ते, चौक, रहदारीचे ठिकाणे इ. ठिकाणी १६.०० ते १८.०० वाजेपर्यंत नाकाबंदी राबविण्यात आली होती.
सदर नाकाबंदीकरीता पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील ४ अपर पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी, ०५ परिमंडळीय पोलीस उपायुक्त १० विभागीय सहायक पोलीस आयुक्त, ३९ पोलीस स्टेशन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक गुन्हे, तपास पथकातील अधिकारी, चौकी अधिकारी, वाहतुक शाखा, गुन्हे शाखा असे संयुक्तपणे मिळुन एकुण ९७ पोलीस अधिकारी व १८७२ पोलीस अमंलदार यांनी सहभाग घेतला.
सदर नाकाबंदी दरम्यान पुणे शहरातील एकुण ७८ महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी राबवुन एकूण ४,१८७ वाहने तपासुन राँग साईड ड्रायव्हिंग, ट्रिपल शीट, सीट बेल्ट परिधान न केलेल्या प्रकरणी वाहतुक नियमांचे उल्लघंन करणा-या १,५१८ वाहनांवर कारवाई करून एकुण १३,६५,१००/-रू. दंड वसुल करण्यात आला आहे. नाकाबंदी दरम्यान एकूण ३७१ वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस आयुक्त पुणे शहर, मा. पोलीस सह आयुक्त पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अपर पोलीस आयुक्त, सर्व परिमंडळीय पोलीस उपायुक्त, सर्व विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस स्टेशन कडील अधिकारी अमंलदार तसेच वाहतुक शाखा व गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे कारवाई केलेली आहे.
पुणे शहरातील सर्व नागरिकांना पुणे पोलीस दलातर्फ आवाहन करण्यात येते कि, सर्वानी वाहतुक नियमांचे पालन करुन, वाहतुक शिस्त पाळावी.









