पुणे अंमली पदार्थ विरोधी पथक १ ने खराडी परिसरामध्ये मेफेड्रोन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारया आरोपी हर्षवर्धन धुमाळच्या आवळल्या मुसक्या

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

पुणे

दि. २६/०७/२०२५ रोजी अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना खराडी पुणे येथील स्वामी समर्थ प्लाझा बिल्डींग समोर, थिटे वस्ती, काळुबाई नगर येथे सार्वजनिक रोडवर, खराडी पुणे येथे इसम नामे हर्षवर्धन राहुल धुमाळ हा त्याच्या ताब्यातील नंबर प्लेट नसल्याली के.टी.एम मोटार सायकल राँग साईडने भरधाव वेगाने येत असल्याचे दिल्याने त्यास लागलीच अंमली पदार्थ विरोधी पथक १ कडील अधिकारी, अंमलदार व खराडी पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी थांबवून त्याच्या कडे विचारपुस करता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला.

सदर इसमाची झडती घेतली असता आरोपी नामे हर्षवर्धन राहुल धुमाळ वय २० वर्षे, रा. दुर्गा माता मंदिर जवळ, एकनाथ पठारे वस्ती, चंदननगर खराडी पुणे याचे ताब्यात ६,२३,६००/-रु. कि.चा ऐवज त्यामध्ये ४,६३,६००/- रु.कि.चा. २३ ग्रॅम १८ मिलीग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ, १,००,०००/- रु.किं. ची एक मोटार सायकल, ६०,०००/- रु.कि चा एक मोबाईल फोन, ००/- रु. किं. वे २० पारदर्शक प्लॅस्टीकच्या छोट्या रिकाम्या पिशव्या, ००/- रु.किं चे एक काळया रंगाचे पॉकेट पाऊच असा ऐवज जवळ बाळगताना मिळून आल्याने त्याचे विरुध्द खराडी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १५३/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब), अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरील नमुद कारवाई ही मा. पोलीस आयुक्त श्री.अमितेश कुमार, मा. सह पोलीस आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, मा.अपर पोलीस आयुक्त, श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उप आयुक्त, श्री. निखील पिंगळे, मा. सहा पो आयुक्त, गुन्हे २ श्री. राजेन्द्र मुळीक यांचे मार्गदर्शना खाली अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पुणे शहर कडील पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस उप निरीक्षक दिगंबर कोकाटे, पोलीस अंमलदार, संदिप शिर्के, दयानंद तेलंगे, नागनाथ राख, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदेश काकडे, दत्ताराम जाधय, खराडी पोलीस स्टेशन कडील पोलीस उप निरीक्षक राहुल कोळपे, पोलीस अंमलदार नाणेकर यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट