पालघर रेल्वे पोलीस ठाणे तर्फेआगामी होळी, धुलीवंदन सणाच्या अनुषंगाने जनजागृती अभियान…

प्रतिनिधी-मंगेश उईके
पालघर:-दि.२२/०३/२०२४ रोजी पालघर रेल्वे पोलीस ठाणे हद्दीतील * पालघर रेल्वे स्टेशन पुर्व बाजुस रेल्वे ट्रॅक नजीक शहर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या गांधीनगर झोपडपट्टी,पालघर येथे होळी , धुलीवंदन सणाच्या अनुषंगाने जातीय सलोखा ( मोहल्ला कमिटी ) ची बैठक वरिष्ठ पोलीस निरीक्षक. सचिन इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक/कानपिळे , गोपनिय शाखेचे पोहवा/2860 मोर ,स्टेशन ड्युटीवरिल पोलीस अंमलदार व होमगार्ड यांच्यासह बैठक घेऊन तसेच झोपडपट्टीमध्ये फिरून खालील प्रमाणे जनजागृती पर सूचना देण्यात आलेल्या.
१) आगामी होळी /धुलीवंदन या सणाच्या” अनुषंगाने , होळी दिवशी , होळी ही रेल्वे ट्रॅक पासून दूर अंतरावर पेटवावी तसेच सदर सणाच्या कालावधीत रेल्वे ट्रॅक परिसरात, धावत्या लोकल व मेल/ एक्सप्रेस गाडीवर रंगाने भरलेले फुगे अथवा तत्सम वस्तू लहान मुलांकडून फेकली जाणार नाही याची पालकांनी दक्षता घ्यावी . असे कृत्य केल्याने काय दुष्परिणाम होतात व कायदेशीर कारवाई काय केली जाते याबाबत उपस्थित नागरिक व मुलांना माहिती देऊन कोणीही रेल्वे ट्रॅक नजीक रंगपंचमी खेळणार नाही याची सर्वांनी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले.


२) तसेच अशा प्रकारचे कृत्य करताना कोणी दिसून आल्यास त्याची तात्काळ माहिती रेल्वे पोलीस हेल्पलाइन १५१२,१३९ किंवा शहर पोलीस ठाणे हेल्पलाइन नंबर १००,११२ वर कळवणे बाबत सूचना देण्यात आली.
३) तसेच INPUTS च्या अनुषंगाने दक्ष व सतर्क राहण्याच्या सूचना देऊन रेल्वे ट्रॅक परिसरात कोणी संशयित किंवा हालचाली दिसून आल्यास त्याची माहिती तात्काळ पालघर रेल्वे पोलीस ठाणे अगर रेल्वे पोलीस हेल्पलाइन नंबर १५१२,१३९ किंवा शहर पोलीस हेल्पलाइन नंबर १००,११२ वर कळविण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.
४) तसेच सध्या मुस्लिम बांधवांचा रमजान महिना सुरू असून सणासुदीच्या काळात कोणतेही गालबोट लागेल असे कोणतेही कृत्य करू नये. सर्वांनी जातीय सलोखा राखून बंधू भावाने एकोप्याने सण साजरा करावीत. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे जनजागृतीचे आवाहन नागरिकांना पालघर रेल्वे पोलीस ठाणे यांनी केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com