व्यावसायिक आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत लावणे बंधनकारक असल्याचे कामगार उपायुक्त श्री विजय चौधरी यांचे दुकानदारांना आव्हान..

उप संपादक – मंगेश उईके
पालघर


पालघर दिनांक २६ : महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्ती चे नियमन) अधिनियम, २०१७ च्या कलम ३६ (क) (१) अंतर्गत सर्व व्यावसायिक आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत लावणे बंधनकारक आहे. या संदर्भात विविध वृत्तपत्रातून हॉटेल, दुकाने व आस्थापनांच े नामफलक देवनागरी लिपीतील मराठी भाषेत लावलेले नसल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या बातमींच्या अनुषंगाने कामगार उप आयुक्त, पालघर यांच्या निर्देशानुसार पालघर जिल्ह्यातील विविध ठिकाणी विशेष पथकामार्फत तपास मोहिम राबवण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत हॉटेल्स, दुकाने व इतर व्यावसायिक आस्थापनांना भेटी देऊन नामफलकांची तपासणी करण्यात आली. नामफलकांवर देवनागरी लिपीतील मराठी भाषेत नामफलक न लावलेल्या ६५ आस्थापनांना तात्काळ नामफलक दुरुस्त करण्याबाबत नोटीसा बजावण्यात आलेल्या आहेत. ज्या हॉटेल, दुकाने व आस्थापना उक्त तरतुदींचे पालन करणार नाहीत त्यांच्या विरुद्ध वर नमूद अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
मोहिम पुढील काही दिवस सुरू राहणार असून पालघर जिल्ह्यातील सर्व आस्थापनांनी तात्काळ देवनागरी लिपीतील मराठी भाषेत नामफलक लावावेत, असे आवाहन कामगार उप आयुक्त, यांनी केले आहे.