ना जाती साठी ना पाती साठीएक दिवस रक्षणकर्त्या पोलिसांसाठी..!!-महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेतर्फे विशेष श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन संपन्न…

उपसंपादक-रणजित मस्के

पालघर :– महाराष्ट्र पोलीस बाँईज संघटनेचे माननीय संस्थापक /अध्यक्ष मा.श्री.राहुल अर्जुनराव दुबाले साहेब व महाराष्ट्र राज्य सचिव मा.श्री.योगेश कदम साहेब, मुंबई / पालघर जिल्हा अध्यक्ष मा. श्री. मनीष जयस्वाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली..



26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम व आपल्या जीवाची बाजी लावून मुंबई शहराचे रक्षण केले व दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर दिले.
अशा या विरांचा उचित सन्मान व्हावा व समाजामध्ये अशा योद्धांचा कायम आदर व्हावा व खाकी गणवेश याबद्दल सर्व नागरिकांमध्ये आदरयुक्त दरारा राहावा म्हणून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम राबवण्यात आले.
26/11: यांचे बलिदान कायमच प्रेरणा देईल आम्हाला.
शुरतेची गाथा…
26 नोव्हेंबरला मुंबईवर अतिरेक्यांनी आत्मघातकी हल्ला केला.या हल्ल्याने अवघा देश हादरला.
अत्याधुनिक हत्यारं, प्रचंड दारूगोळा आणि प्लॅनिंग करुन या अतिरेक्यांनी मुंबईत हैदौस घातला.
अशा युद्धजन्य परिस्थितीत मुंबई पोलिसांनी जीव धोक्यात टाकून अतिरेक्यांशी सामना केला.
मुंबई पोलिसांनी अतिरेक्यांना कशी कडवी झुंज दिली, एनएसजी कमांडो येईपर्यंत मोर्चा कसा सांभाळून ठेवला आणि त्यात मुंबई पोलिसांना कसं यश आलं हे स्पष्ट होतंय. पण, त्यावेळी मुंबई पोलीसांनी गमावले ते कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून या वर्षीचा 26/11 बलिदान प्रेरणा व श्रद्धांजली चा कार्यक्रम देश भर गाजला पाहिजे असे काम सर्वांनी करा..
सदर कार्यक्रम दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी संध्याकाळी 6:30 वाजता सर्व पदाधिकारी व सदस्यांनी हुतात्मा चौक पाच बत्ती पालघर या ठिकाणी आपल्या मित्र परिवार सह उपस्थित राहून शहिद जवानांनाच्या प्रतिमे समोर * मेणबत्ती पेटवून फुल वाहून दोन मिनिटं निशब्द मानवंदना देऊन श्रद्धांजली व्हाहुन करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी. पालघर पोलीस निरीक्षक मा. श्री. दत्तात्रय किंद्रे साहेब , पोलीस कॉन्स्टेबल श्री.कोंढारी ,
मेजर वाहतूक पोलीस ए एस आय श्री. सायबु तळवी ,मेजर वाहतूक पोलीस कॉन्स्टेबल प्रभाकर इंगळे, मेजर पालघर लोकपाल श्री. छबीलदास गायकवाड साहेब , अंबुरे साहेब व पालघर रहिवासी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित दाखवल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद मानण्यात आले.
आयोजक
श्री.मंगेश अ. उईके पालघर जिल्हा महासचिव
पालघर जिल्हा संपर्कप्रमुख चिन्मय पाटील सल्लागार,श्री.संजय राऊत साहेब
पालघर तालुका अध्यक्ष श्री.संदेश मोरे साहेब पालघर तालुका सचिव श्री.किरण पाटील साहेब पालघर संघटक श्री.अमोल गायकवाड साहेब आणि पालघर जिल्हा टीम उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com