प्रधान वनसंरक्षकांना मॅट न्यायालयाचा दणकाकाळी(दौ)च्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश केले रद्द..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

यवतमाळ: महागाव – अधिकाऱ्यांवर अनियमिततेचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्याचे प्रधान वनसंरक्षकांनी काढलेले आदेश रद्द करीत त्यांना असा आदेश काढण्याचे अधिकार नसल्याचा निवाळ मॅट कोटार्ने दिला आहे.

वनपरिक्षेत्र महागाव तालुक्यातील काळी (दौ) वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कुरोडे यांच्या कामात अनियमितता असुन कार्यालयीन कामकाज योग्य रीतीने न करता ते कर्तव्याप्रति निष्काळजी पणे वागत असुन त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांचे वेतन विहित मुदती मध्ये काढत नसुन ते त्याबद्दल वरिष्ठांना कोणतीही माहिती देत नसल्याचा आरोप करीत प्रधान वनसंरक्षकांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले होते.

कुरोडे यांनी प्रधान वनसंरक्षकांच्या या आदेशाला मॅट न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल केली होती तेव्हा याचिककर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले की कुरोडे हे वर्ग २चे अधिकारी असुन त्यांचे नियुक्ती व शिस्त अधिकारी राज्य सरकार असुन प्रधान वनसंरक्षक हे नियुक्ती अधिकारी नसतांना त्यांनी घेतल्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल१९७९चे नियम क्र. ४ उल्लंघन करीत वनपरिक्षेत्र अधिकारी कुरोडे यांचे निलंबन केले असुन त्यांनी याबाबत नियुक्ती अधिकारी असलेल्या राज्य सरकार ला याबाबत सुद्धा उशिरा कळविले आहे. व कुरोडे आहे आपल्या कर्तव्याप्रती समर्पण भावनेनेच काम करीत असल्यामुळे त्यांना ३१ ऑगस्ट २०१९ रोजी बढती मिळाली व ते अकोला येथे सामाजिक वनीकरण विभाग अकोला येथे रूजु झाले त्यानंतर त्यांची काळी (दौ) ता. महागाव जि. यवतमाळ येथे बदली करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाचे न्यायाधीश एम.ए. लवेकर यांनी दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकुन प्रधान वनसंरक्षकांनी कोणतेही अधिकार नसतांना वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कुरोडे यांचे केलेले निलंबन नियमबाह्य असल्याचा निवाळ देत त्यांचे निलंबनाचे आदेश रद्द केले यावेळी याचिककर्त्यांच्या वतीने अँड. जि. जि. बढे यांनी कामकाज पाहिले.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट