केशोरी पोलीस स्टेशनच्या “एक दिवस, चिमुकल्यांसोबत” उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना खेळांचे साहित्य भेट

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- केशोरी पोलीस स्टेशनच्या “एक दिवस, चिमुकल्यांसोबत” उपक्रमा अंतर्गत प्रत्येक महिन्याला पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना भेट देऊन त्यांच्याशी विविध विषयांवर गप्पा गोष्टी केल्या जातात तसेच “गुड टच, बॅड टच” बाबत देखील माहिती दिली जाते.

आज जिल्हा परिषद शाळा धमदीटोला येथील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना भेटून त्यांना सर्व “खेळांचे साहित्य” भेट देऊन खाऊ वाटप करण्यात आला. खेळाचे साहित्य मिळाल्यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता.

सदरचा स्तुत्य उपक्रम मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. नित्यानंद झा, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया, श्री. संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोमनाथ कदम, पोउपनि प्रताप बाजड, पोउपनि भोळे, पोहवा. चंद्रकांत भोयर, पोहवा. सुशिल रामटेके, मपोहवा. पुनम हरिणखेडे, मपोहवा मीना चांदेवार, पो.शि. खुशाल बागडकर यांनी अतिशय उत्कृष्टरित्या राबवला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट