प्रेरणा सभागृह पोलीस मुख्यालय गोंदिया येथे..”पोलीस काका”/”पोलीस दिदी” कार्यशाळा संपन्न-

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

गोंदिया ;

–दामिनी पथकाचे स्तुत्य उपक्रम–

🕹️ पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांचे संकल्पनेतून अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह) श्रीमती- नंदिनी चानपुरकर मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हयात प्रभावीपणे “पोलीस काका” व “पोलीस दीदी” उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत….या अनुषंगाने “दामिनी पथक” सतत शाळा, महाविद्यालय परिसरात विद्यार्थाच्या सुरक्षीततेकरिता पैट्रोलींग करित असतांना शाळेला ला भेट देतात व विद्यार्थाना गुड टच/बेड टच, सायबर क्राईम, लैंगिक अत्याचारापासुन बालकाचे संरक्षण अधिनियम- 2012, मोटार वाहन अधिनियम, रस्ता सुरक्षा, बालविवाह, तसेच बालकांचे लैंगिक छळवणूक ईत्यादी बाबत विद्यार्थानां उत्तम प्रकारे मार्गदर्शन करित असतात. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयीन मुलीच्या रक्षणासाठी/मार्गदर्शनाकरिता त्या- त्या हद्दीतील पोलीस ठाण्यात अधिकारी/अंमलदार- (पोलीस काका/पोलीस दिदी) नियुक्त करण्यात आले आहेत.अधिकारी व अंमलदार यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा आज दिनांक- 29-01-2025 ला दामिनी पथकातर्फे प्रेरणा सभागृह गोंदिया येथे घेण्यात आली.

  सदर कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शन म्हणून मा. नंदिनी चानपुरकर मॅडम (प्रभारी पोलीस उप-अधिक्षक गृह) म. पोउपनि. पुजा सुरळकर, (दामिनी पथक) पो.शि. राजेंद्र अंबादे, पो.शि. प्रशांत बंसोड, म.पो.शि. वैशाली भांदक्कर, म.पो.शि प्रिती बुरेले, नापोशि. राधेश्याम रहांगडाले यांनी केले तसेच आंतरजातीय/ आंतर धर्मीय विवाह करणाऱ्यांना सुरक्षा देणे संबधाने मार्गदर्शन म.पो.हवालदार तनुजा मेश्राम (भरोसा सेल गोंदिया) यांनी केले तसेच मोठ्या संख्येने पोलीस स्टेशन स्तरावरिल नियुक्त करण्यात आलेले पोलीस अधिकारी/अंमलदार (पोलीस काका/पोलीस दिदी) हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट