प्रेमात फसवुन हनी ट्रपद्वारे 10 लाखाची मागणी करणाऱ्या टोळीस कोल्हापुर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ठोकल्या बेडया

कोल्हापूर : येथील मुलीने तरुण व्यवसायिक तरुणाला प्रेमात पाडलं आणि नंतर त्याच्यासोबत केला धक्कादायक प्रकार हनी ट्रॅपच्याद्वारे 2 लाख 50 हजार रुपयांना लुटणाऱ्या टोळीस पोलिसांनी अटक केली
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कोल्हापुरातील एका तरूण कापड व्यावसायिकाची एका अल्पवयीन मुलीशी ओळख झाली. नंतर तिने त्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. विश्वास संपादन केला आणि एक दिवस ती त्याच्या फ्लॅटवर गेली. पाठोपाठ तिचे 6 साथीदार तेथे पोहोचले. “दहा लाख रूपये दे नाही तर तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करतो “अशी धमकी त्यांनी दिली. घाबरलेल्या या युवकाने 1 लाख 50 हजार रूपये दिले.
तसेच त्याच्याकडून 3 कोरे चेकही घेतले. त्यावर सही घेतली आणि त्याला निर्जन ठिकाणी नेऊन मारहाणही केली. काही दिवसांनी पुन्हा त्याला एका फायनान्स कंपनीत नेले. तेथे त्याचे सोने गहाण ठेवून 1 लाख रूपये घेतले. त्यानंतर वांरवार त्याला धमकी देत पैसे उकळत राहिले. वारंवार या धमक्यांना घाबरत त्याने किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण नातेवाईकांनी त्याला वाचवलं.
या टोळीच्या सततच्या धमकीने शेवटी त्या तरूणाने जवळील पोलिसात फिर्याद दिली. स्थानिक गुन्हा अन्वेषन शाखेने सापळा लावला आणि पैसे देण्यासाठी त्यांनी तरूणीसह तिच्या साथीदारांना एका ठिकाणी बोलवण्यास सांगितलं. त्या तरूण व्यापाऱ्याने बोलवताच सर्वजण पैसे घेण्यासाठी आले आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडले, ज्यामुळे हनी ट्रॅप टोळीचा भांडाफोड झाला.याबाबत टोळीचा म्होरक्या असलेला सागर माने हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. हनी ट्रॅपच्या माध्यमातून तरूणाला लुटल्याप्रकरणी त्याच्यावर आणि अन्य 5 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये आकाश पाटील, अरबाज मुटंगी, सौरभ चांदणे, लुकमान सोलापुरे व उमेश साळुखे यांच्यासह एका अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक श्री. शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. तिरूपती काकडे, पोलीस निरीक्षक श्री प्रमोद जाधव यांच्यासह त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
dipakbhogal@surakshapolicetimes.com