मुसळधार पावसात कोसळलेल्या घराचे मा.आ.प्रकाशदादा सुर्वे यांनी स्वखर्चाने नूतनीकरण करून मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केले चावीचे वाटप…

0
Spread the love

प्रतिनिधी-अक्षय कांबळे

मागाठाणे :

मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्र.३ मधील श्री.नवलेश पंडीत राहणार शिवाजी नगर,शिव शक्ती चाळ,केतकीपाडा,दहिसर ( पु ) यांचे दि.२५/७/२०२३ रोजी मुसळधार पावसामुळे जमीन खचून संपूर्ण घर कोसळले आणि संपूर्ण संसाराची जीवनपुंजी गेली.

हे संकट कळताच मागाठाणे विधानसभा क्षेत्राचे आमदार/विभागप्रमुख श्री.प्रकाशदादा सुर्वे यांनी श्री.पंडीत यांचे घर पूर्णपणे स्वखर्चाने नव्याने बांधून दिले आणि दि. ७/९/२०२३ रोजी कोकुळाष्टमी दिवशी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते घराच्या चाव्या देण्यात आल्या.

सदरवेळी आमदार श्री.प्रकाशदादा सुर्वे,सिनेअभिनेते शक्ती कपूरजी,शाखाप्रमुख श्री.प्रकाश पूजारी आणि पदाधिकारी उपस्थित होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट