दादालोरा खिडकी योजना “कम्युनिटी पोलीसिंग” च्या माध्यमातून AOP बोन्डे, पो. ठाणे चिचगड, देवरी तर्फे करण्यात आलेले स्तुत्य उपक्रम…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-

याबाबत थोडक्यात माहिती अशी की,पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे "  यांचे संकल्पनेतून व अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली " कम्युनिटी पोलिसिंग" च्या माध्यमातून पोलीस दादालोरा खिडकी योजने अंतर्गत "उपविभागीय पोलिस अधिकारी, देवरी श्री. विजय भिसे, यांचे  मार्गदर्शनात कम्युनिटी पोलिसिंगच्या माध्यमातून पोलिस स्टेशन चिचगड यांचे नेतृ्त्वाखालील सशस्त्र दुरक्षेत्र बोंडे येथील प्रभारी अधिकारी पो. उप. नि. राहुल दुधमल, आणि पोलीस अंमलदार यांचेसह दिनांक - 13/06/2023 रोजी अति संवेंदनशील असलेले ग्राम - सर्रेगाव गावाची लोकसंख्या फक्त 22 घरे इतकी कमी लोकसंख्या असल्यामुळे सदरचे गाव हे अनेक सुख सुविधा पासून वंचित आहे.. तसेच गावांतील ज़िल्हा परिषद शाळेत फक्त 6 मुले असून अंगणवाडी शाळेत 19 मुले आहेत.. 

   दादलोरा खिडकी योजनेची प्रभावी अंमल बजावणी करता यावी याकरिता, गोंदिया पोलीस दलामार्फत.... अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, सो यांचे हस्ते सदर जिल्हा परिषद चे शाळेतील शालेय मुला मुलींसाठी स्कूल बॅग, कंपास बॉक्स, ड्रॉईग बुक, तसेच मुलींसाठी स्किप जंप ( दोरी) इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले आहे..

          तसेच गावांतील महिलांना चहाचे सेट व ट्रे देण्यात आले.... सदर उपक्रमास पुरुष व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवीला .

         जिल्हा पोलीस दलातर्फे टीम- कम्युनिटी पोलिसिंग, AOP बोन्डे,  पो.स्टे. चिचगड, देवरी तर्फे केलेल्या स्तुत्य उपक्रमाचे शाळेतील मुख्याध्यापक श्री. वासनिक सर , आणि गांवकरी मंडळींनी पोलीस दलाचे आभार व्यक्त केले.. 

     सदरचे गाव हे लोक प्रवाहात यावे याकरिता भविष्यातही असेच नव- नवीन उपक्रम सदर गावात घेण्याची विनंती उपस्थीत गावकऱ्यांनी केली.. असून 

उपक्रम हा शांततेत पार पाडण्यात आला. सदरचे कार्यक्रमास गावातील संपूर्ण गावकरी उपस्थीत होते.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट