सशस्त्र दूरक्षेत्र मगरडोह चे स्तुत्य उपक्रम…”दादालोरा खिडकी योजना ” एक हात मदतीचा” अंतर्गत “एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत” उपक्रमाचे आयोजन..

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. निखिल पिंगळे “यांचे संकल्पनेतून व “कम्युनिटी पोलीसिंग” च्या माध्यमातून *”अप्पर पोलीस अधीक्षक” श्री. अशोक बनकर. कॅम्प देवरी,” उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. संकेत देवळेकर, यांचे मार्गदर्शनाखाली, आगामी दिवाळी सणाचे औचित्त साधून AOP मगरडोह हद्दीतील अतीदुर्गम भागातील ग्राम चिलमटोला येथील सर्व नागरिकांना “दादालोरा खिडकी योजना” “एक हात मदतीचा” या योजने अंतर्गत ” “*एक दिवाळी आदिवासी बांधवासोबत” या उपक्रमाचे आयोजन दिनांक 08/11/ 2023 रोजी करण्यात आले होते..उपक्रम उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. संकेत देवळेकर, यांच्या उपस्थीत राबविण्यात आला…
आयोजीत कार्यक्रमास ग्राम -चिलमटोला येथील आदिवासी महिला व पुरुष बांधवांना, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. संकेत देवळेकर , यांच्या तर्फे दिवाळी भेट म्हणून 40 कुटुंबांना मिठाई बाॅक्स, लाडूचे बाॅक्स , चिवडा पाॅकेट, आणि ब्लॅन्केट असे साहित्य , सामान वाटप करण्यात आले…..आदिवासी बांधव यांच्यासोबत दिवाळी साजरी करण्यात आली….. …..तसेच कार्यक्रमास उपस्थित नागरिकांना गोंदिया जिल्हा पोलीस दलाकडून श्री. संकेत देवळेकर, यांनी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहीती दिली…… तसेच लोकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सदर कार्यक्रमाला ग्राम – चिलमटोला येथील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते….
सदरचा उपक्रम पार पाडण्यासाठी PSI रामेश्वर ढाकणे , प्रभारी कम्युनिटी पोलिसिंग, टीम AOP मगरडोह, आणि अंमलदार यांनी पो.स्टे. चिचगड, च्या सहकार्याने अथक परिश्रम घेवून शांततेत उपक्रम पार पाडला.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com