महाडमध्ये प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिन मोठया उत्साहात साजरा…
प्रतिनिधी-सखाराम साने
महाड:– असा उत्कृष्ट नियोजन कार्यक्रम मि आज पर्यंत कधीच पाहिला नाही : तहसिदार शितोळे
दिव्यांगाना माझा सहकार्य सदैव राहेल: डाॅ वैभव धारप
ग्रामपंचायत तिने पाच टक्के निधी दहा दिवसात खर्च केला नाही तर प्रहार अपंग क्रांती संघटना आंदोलन करेल असा इशारा दिला फैज हुर्जूक
प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने रविवार दिनांक 3/12/2023 रोजी महाड वीरेश्वर मंदिर येथे दिव्यांग अपंग दिन महाड तहसील कार्यालयाचे तहसीलदार शितोळे सर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना गीताने करण्यात आले प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष शितल दुसऱ्यांनी पुष्पहार अर्पण केला व दीपप्रजळण संदीप सकपाल कमलेश कोरपे प्रमोद महाडिक यांनी केले .
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वैभव धारप, कमलेश कोरपे, प्रमोद महाडिक, हनीफा पाल, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष फैज हुर्जूक, तहसीलदार शितोळे , संदीप सकपाल, पत्रकार निलेश लोखंडे ,संघटनेचे सचिव सचिन सुतार ,नितेश लोखंडे आधी प्रहार क्रांती अपंग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी सर्व मान्यवरांनी आपआपली मनोगते मांडली डॉक्टर वैभव धारप मी दिव्यांग यांच्या पाठीशी नेहमी सदैव आहे असे आपल्या भाषणात सांगितले.
यावेळी संदीप सकपाल प्रमोद महाडिक कमलेश कोरपे हनीफा पाल आदी मान्यवरांनी आपली मनोगते मांडली त्यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात तहसीलदार शितोळे सर यांनी आजचा हा उत्कृष्ट असा कार्यक्रम मी कधीही पाहिला नव्हता असे सांगितले .
यावेळी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे अध्यक्ष फैज हुर्जूक ग्रामपंचायत तिने पाच टक्के निधी दहा दिवसात खर्च केला नाही तर प्रहार अपंग क्रांती संघटना आंदोलन करेल असा इशारा दिला .
पत्रकार निलेश लोखंडे यांनी सुद्धा आपले विचार मांडले दिव्यांगा मुलांचा गाण्यांचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साने गुरुजी यांनी केले व प्रास्ताविक सचिन सुतार यांनी केले.
संघटनेचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी मेहनत घेतली प्रहार क्रांती अपंग संघटनेचे अध्यक्ष फैज हुर्जूक यांनी सर्व मान्यवरांचे व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com
