पोस्को एशिया फेलोशिप पुरस्कार सोहळा २०२४ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे संपन्न

0
Spread the love

प्रतिनिधी :-सचिन पवार
माणगांव रायगड

माणगांव :-पोस्को टी. जे. पार्क फाऊंडेशन आणि पोस्को महाराष्ट्र स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पोस्को एशिया फेलोशिप पुरस्कार सोहळा २०२४” हा एक प्रेरणादायी सोहळा २ डिसेंबर २०२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ (DBATU), लोणेरे येथे पार पडला. हा सोहळा विद्यापीठासाठी एक अभिमानाचा क्षण ठरला, जिथे १५ विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनती, अभ्यासू वृत्ती आणि उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीसाठी सन्मान करण्यात आला.
या सोहळ्याला पोस्को टी. जे. पार्क फाऊंडेशनचे प्रमुख श्री. ओह यंग डल हे दक्षिण कोरियाहून विशेष उपस्थित होते आणि पोस्को महाराष्ट्रचे स्टील चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. किम दे अप, विद्यापीठाचे मान्यवर कुलगुरू, प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या भव्यतेने उपस्थितांना नवीन उर्जा आणि प्रेरणा दिली.यावर्षी साठी निवड झालेल्या १५ विद्यार्थ्यांना या सोहळ्यात प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि ८०० अमेरिकन डॉलर्स प्रदान करण्यात आले. २०१५ पासून सुरु असलेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे. या फेलोशिपसाठी निवड होणे हे सहज शक्य नव्हते; विद्यार्थ्यांना मेहनतीच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचावे लागते. सतत अभ्यास, आत्मविश्वास, आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळेच या फेलोशिपसाठी पात्र ठरता येते. आत्तापर्यंत ही फेलोशिप विद्यार्थ्यांसाठी एक नवी दिशा आणि प्रेरणा देणारी ठरली आहे.
पोस्को टी. जे. पार्क फाऊंडेशनचे प्रमुख श्री. ओह यंग डल यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले, “पोस्को फेलोशिप मिळवणे हे मेहनतीचे प्रतीक आहे. यासाठी कठीण परिश्रम आणि दृढ निश्चयाची आवश्यकता आहे. तुमची स्वप्ने मोठी असली पाहिजेत, आणि त्यांना साकार करण्यासाठी तुम्ही कोणतीही कसर ठेवू नका. हा तुमचा पहिला टप्पा आहे, आता आयुष्यात आणखी मोठे यश मिळवा.”

विद्यार्थ्यांचे अनुभव हे कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य होते. अनेक विजेत्यांनी व्यासपीठावरून आपले अनुभव सांगितले – ज्या कठीण प्रसंगांवर मात करून त्यांनी हे यश मिळवले, ते ऐकून उपस्थित विद्यार्थी भारावून गेले. या प्रेरणादायी कहाण्यांनी सगळ्यांना पुढे जाण्यासाठी नवीन जोम मिळवून दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी डीन प्रा. अरविंद किवेळेकर यांनी पोस्को महाराष्ट्रचे कंपनीचे आभार मानले व सांगितले की, “पोस्को सारख्या जागतिक पातळीवरील संस्थेने आमच्या विद्यार्थ्यांना असा मंच उपलब्ध करून दिला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी, मेहनत करण्यासाठी आणि मोठी स्वप्ने पाहण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली आहे.”श्रिया पाटील हिने या सोहळ्याचे विशेष कौतुक केले आणि मनोगत व्यक्त केले. तिने सांगितले की,“पोस्को एशिया फेलोशिप आमच्यासाठी एक संधी आहे जी आम्हाला पुढे शिकण्यासाठी आणि आमच्या ध्येयांकडे आत्मविश्वासाने जाण्यासाठी मदत करेल. ही फेलोशिप मिळवणे सोपे नव्हते, पण मेहनतीने ते शक्य झाले.”पोस्को एशिया फेलोशिप पुरस्कार सोहळा हा केवळ एक पुरस्कार सोहळा नव्हता, तर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरले. हा कार्यक्रम मेहनतीचे महत्त्व पटवून देत पोस्कोच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा ठळक प्रत्यय देतो. विद्यार्थ्यांनी भविष्यात आणखी मोठे ध्येय गाठण्यासाठी, कष्ट घेऊन पुढे जाण्याचा निर्धार केला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट