पोलीसांच्या प्रामाणिकतेवर बोलणाऱ्या आ.संजय गायकवाड याना मयुर कारंडे याचा इशारा..

सह संपादक – रणजित मस्के
नवी मुंबई:

स्वतः मध्ये एवढी धमक आहे ना, तर स्वताचे पोलीस संरक्षण काढून ह्यापुढे पोलीस बांधवांवर बोलून दाखवा असा थेट इशारा महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना “नवी मुंबई शहर अध्यक्ष मयुर कारंडे” ह्यांनी “आमदार संजय गायकवाड” ह्यांना दिला.
काही राजकीय महाशय आपली राजकीय पोळी भाजायच्या उद्देशाने, स्वतःची पात्रता दाखवायला लागलेत, पोलिसांवर आणि त्यांच्या प्रामाणिकतेवर बोलायच्या अगोदर आपला प्रामाणिक पणा आख्या महाराष्ट्राने अगोदर पाहिला आहे, हे विसरु नका. ज्या पोलिसांच्या संरक्षणात स्वतः असता, आणि त्याच पोलिसांना अकार्यक्षम बोलतायत, मग नका घेऊ ना आमच्या पोलीस बांधवांचे संरक्षण, आमच्या पोलीस बांधवांवर ५०-५० लाख असले खोटे आरोप करण्यापेक्षा, हा असा ५० चा आकडा तुम्हालाच शोभून दिसतो, हे सर्व राज्याला ज्ञात आहे.
पोलीस बांधवांना "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" चा अर्थ आणि त्याची जवाबदारी खुप चांगली माहीत आहे, म्हणून आपन आपले ज्ञान पाजळू नये, अगोदर आपन स्वतः लोकप्रतिनिधिनी कोणाबद्धल कुठे काय बोलावे ह्याचा अभ्यास करावा.
आमदार.संजय गायकवाड़ ह्यांनी केलेल्या चुकीच्या विधानाबद्धल राज्यातील सर्व पोलिसांची माफ़ी मागावी, आणि ह्यापुढे पोलीस बांधवाबद्द्ल बोलताना आपन एक लोकप्रतिनिधी आहे ह्याचा विसर पडून देऊ नका, असा खोचक इशारा "महाराष्ट्र पोलीस पोलीस बॉईज संघटना:- मयुर कारंडे (नवी मुंबई शहर अध्यक्ष" ह्यांनी दिला.