पोलीसाला कर्नाटकामध्ये वेशांतर करून पाठविल्यामुळे एका खुनाचा छडा..

उपसंपादक – रणजित मस्के
सांगली :-गिरगाव (ता. जत) येथे संशयित दत्ता यलाप्पा बजंत्री (रा. विजयपूर) याने किरकोळ वादातून मित्र महादेवाप्पा हिरेमठ (वय ३५, विजयपूर) याचा भोसकून खून केला. खुनानंतर तो सात महिने पोलिसांना चकवा देत होता. अखेर विजयपूर येथे एका पोलिसाला वेशांतर करून पाठवले. पोलिस कर्मचारी सेंट्रिगच्या कामासाठी दत्ताच्या गल्लीत राहू लागला. १६ व्या दिवशी अखेर फरारी दत्ता रात्री विजयपूरला आला. पैसे घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसाने त्याला पकडले.संशयित आरोपी दत्ता व मृत महादेवाप्पा हिरमेठ हे दोघे विजयपूरचे. दोघांची व्यवसायाच्या निमित्ताने चांगली ओळख होती.
दत्ता याचे गिरगावात पाण्याच्या टाकीचे काम चालू होते २७ जानेवारी २०२३ रोजी दोघांचा किरकोळ कारणावरून वाद झाला. तेव्हा रात्री अकराच्या सुमारास दत्ताने हिरेमठचा धारदार शस्त्राने भोसकून खून केला. त्यानंतर तो रात्रीच पसार झाला.
उमदी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दत्ताच्या शोधासाठी छापे टाकले; परंतु त्याचा ठावठिकाणा समजू शकला नाही.फरारी दत्ता हा मुंबईतील धारावी झोपडपट्टीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथेही शोध घेतला; परंतु तो मिळाला नाही. तब्बल सात महिने दत्ता पोलिसांना चकमा देण्यात यशस्वी ठरला होता.
परराज्यातील असल्यामुळे त्याच्या शोधात अडचणी येत होत्या. तरीही उमदी पोलिसांनी शोध सुरूच ठेवला. उमदीचे सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांना खबऱ्यामार्फत फरारी दत्ता हा विजयपूर येथे ठराविक दिवसानंतर येऊन पैसे घेऊन परत जात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी कन्नड बोलता येणाऱ्या एका पोलिस कर्मचाऱ्याला विजयपूर येथे पाठवण्याचे ठरले.मृत आणि फरारी आरोपी दोघेही विजयपूरचे होते. फरारी संशयित सात महिने पोलिसांना चकमा देत होता. अखेर कन्नड बोलणाऱ्या पोलिसाला विजयपूरला पाठवले.
त्यामुळे संशयिताला पकडता आले.’ राहत असलेल्या गल्लीत वेशांतर करून राहू लागला. सेंट्रिंगचे काम करतो असे दाखवून नातेवाइकाकडे पाहुणा म्हणून राहत होते. पंधरा दिवस रात्रंदिवस वाट पाहिली. अखेर १६ व्या दिवशी फरारी दत्ता घरी आल्याचे समजले. घरी येऊन पैसे घेऊन अंधारात पळून जाण्याच्या तयारीत असताना उमदीच्या पोलिस कर्मचाऱ्याने विजयपूर पोलिसांच्या मदतीने दत्ताला पकडले. त्यानंतर त्याला उमदी पोलिस ठाण्यात आणले गेले. वेशांतर कामी आल्यामुळे खुनाचा पत्ता लागला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com