पोलीस स्टेशन कुन्हा हद्दीत ग्राम कौडण्यपुर येथे अवैधरित्या अगनीशस्त्र, जिवंत काडतूस व धारदार शस्त्र बाळगणारे इसम गजाआड.

0
Spread the love

अमरावती

सह संपादक -रणजित मस्के

एक अग्नीशस्त्र (देशी बनावटीचे पिस्टल), दोन निवंत काडतूस, दोन धारदार तलवारी हस्तगत – कुन्हा पोलीसांची कारवाई

जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच अवैद्य धंद्यांचे समुळ उच्चाटन व्हावे यासाठी पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद सा. व अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत सा. यांची बेधडक कारवाई सुरू आहे. पोलीस ठाणे प्रभारी अधीकारी व अंमलदार यांना अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे सराईत गुन्हेगारांची माहिती घेणेबाबत तसेच जिल्हयातील औद्योगीक दृष्टया प्रगत असलेल्या शहरांमध्ये परराज्या व बाहेरील जिल्हयातुन शस्त्रांची देवाण-घेवान करणारे इसमांचा कसो शिने शोध घेणेबाबत सुचना दिलेल्या आहे.

त्याप्रमाणे दिनांक ११/०६/२०२५ रोजी रात्रीचे सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ग्राम कौडण्यपुर येथील अंजनसींगी टी पॉइंट लगत असलेल्या शेतात काही इसम अगनीशस्त्र (पिस्टल), धारदार शस्त्रे (तलवारी) बाळगूण असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून लपत छपत जावून अग्नीशस्त्र व तलवारी बाळगुन असलेल्या इसमांवर छापा टाकला. सदरचे इसम पोलीसांना पाहुन सतर्क झाले व सावरासावरीचा प्रयत्न करू लागले होते त्यादरम्यान पोलीसांनी सदर इसमाना जागेवरच ताब्यात घेवून त्यांना पोलीस स्टाफ व पंचांचा परीचय देवून त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) शेख शानु शेख जब्बार वय ३५ वर्षे रा. इतरवारा बाजार, वर्धा २) अनिल सुरेश परीयाल वय ४२ वर्षे रा. महादेवपुरा, वर्धा ३) शेख शाहरूख शेख रउफ वय ३० वर्षे रा. महाराणाप्रता वार्ड, आर्वी ४) मोहमद जाफर मोहमद यासीन वय ३० वर्षे रा. गौरक्षण वार्ड, आर्वी ५) आदीत्या किशोर डाकोडे वय २० वर्षे रा. देउवाडा ता. आर्वी जि. वर्धा ६) शेख साबीर शेख कदीर वय ३५ वर्षे रा. जनता नगर, आर्वी व ७) प्रतिक बाबाराव ठाकरे वय ३२ वर्षे रा. रेल्वे स्टेशन, वर्धा असे सांगीतले वत्यांना येथे हजर असन्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे देत होते. सदरचे इसम हे बाहेर जिल्हयातील असल्याने व त्यांचे अस्तीत्व संक्षयास्पद वाटत असल्याने शेतात असलेल्या टिनाची खोली व खोली मागील शेताची पाहनी केली असता सदर शेतामध्ये दोन धारदार तलवारी मिळून आल्या व टिनाच्या खोली समोर उभ्या असलेल्या चारचाकी वाहण क. एम. ३१ सि.एन. ३५९९ च्या समोरील डॅशबोर्ड वरील डिक्कीमध्ये एका कापडी पिशवीत एक अग्नीशस्त्र (देशी बनावटीचे पिस्टल) व एक मॅक्झीन ज्यात दोन जिवंत काडतुस व रोड लगत अभी असलेली टु व्हिलर मोपेड क. एम. एच. २७ बि.यु. ७२७९ ज्याच्या साईड गार्डला एक लोखंडी रॉड तसेच टिनाच्या खोली समोर एक बाशाची काठी व दोन लाकडी दांडके असे दिसून आल्याने पंचासमक्ष जप्त करण्यात आले. सदर ठिकाणावरूण एक अग्नीशस्त्र (देशी बनावटीचे पिस्टल) व एक मॅक्झीन किंमत अंदाजे २०,०००/- रू. व दोन जिवंत काडतुस किं. अं. २०००/- रू. दोन तलवारी किं.अं. ४०००/- रू., एक लोखंडी रॉड किं.अं. ५००/-रू., एक बाशाची काठी किं.अं. १००/- रू. व दोन लाकडी दांडके किं. अं. ३००/- रू., एक चारचाकी वाहण क. एम. ३१ सि.एन. ३५९९ किं.अं. २,००,०००/- रू. व टू व्हिलर मोपेड क. एम. एच. २७ बि.यु. ७२७९ किं.अं. ६०,०००/- रू. असा एकूण २,८६,९०० /- रू. चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. सदर इसमांवीरुध्द विनापरवाना बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्र व धारदार शस्त्र बाळगले प्रकरणी पोलीस स्टेशन कुन्हा, अमरावती ग्रामीण येथे कलम २२३, ३(५), भारतीय न्याय संहिता सहकलम ३,४, २५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीच्या कब्जातुन मिळूण आलेले अग्नीशस्त्र (देशी बनावटीचे पिस्टल), दोन जिवंत काडतुस व दोनी धारदार तलवारी मिळूण आल्याने सदर अवैद्य शस्त्र ग्राम कौडण्यपुर येथे कोठुन आले याबाबत पोलीस पथक पुढील तपास करत आहे.

अमरावती ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री. विशाल आनंद सो., अपर पोलीस अधिक्षक श्री. पंकज कुमावत सो., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल पवार सो. उपविभाग चांदुर रेल्वे व मा. पोलीस निरीक्षक श्री. किरण वानखडे सो. स्थानीक गुन्हे शाखा अमरावती यांचे मार्गदर्शनात व सुवनांप्रमाणे पोलीस पथकातील सपोनी अनुप वाकडे, पोउपनी विलास थुल, ए.एस.आर. सोमेश्वर सपाटे, पोहेकों योगेंद्र लाड, पोहेकॉ अनिल निघोट, पोहेकॉ उमेश वाघमारे, चापोहेकॉ ज्ञानेश्वर देवतळे, पोकों सागर निमकर, पोकों दर्पन बनसोड, पोकों अक्षय विरघट, व पोकों कुणाल भोयर यांनी सदरची कामगीरी केली आहे. अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे इसमांवर यापुढेही अशाच प्रकारे कारवाई सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट