पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचेकडुन एकुण ५ सराईत गुन्हेगारांवर तडीपार कारवाई

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

पुणे ;

पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हेगारीवृत्तीस आळा घालणेकामी व गुन्ह्यांना प्रतिबंध करणेकामी पोलीस स्टेशनचे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर ठोस व परिणामकारक अशी कारवाई करणेबाबत आम्ही परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिलेले होते. सदर आदेशास अनुसरुन परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनकडील सराईत गुन्हेगारांवर वि. २७/०२/२०२५ रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५६ प्रमाणे तडीपार करण्यात आले आहे.

खालील नमुद सराईत गुन्हेगारांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर व पुणे ग्रामिण जिल्ह्याचे हद्दीतुन ०२ वर्षे कालावधीकरीता तडीपार करण्यात आलेले आहे.

अ.क्र पोलीस ठाणे

हडपसर

आरोपी नाव

किशोर अमर सोळंकी, वय २१ वर्षे, रा. बिराजदारनगर, गल्ली नं. ३. कॅनॉल जवळ, वैदुवाडी, हडपसर, पुणे (जबरी चोरी, गंभीर दुखापत, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे एकुण ०४ गुन्हे दाखल आहेत.)

तडीपार कालावधी

०२ वर्षाकरीता

अक्षय अनिल पवार, वय २७ वर्षे, रा. वेताळबाबा वसाहत, कॅर्नीलच्या डाव्या बाजुला, हडपसर, पुणे (दुखापत, जबरी चोरी यासारखे एकुण ०३ गुन्हे वाखल आहेत.)

०२ वर्षाकरिता

कोंढवा

कादीर उर्फ काजु आरीफ अन्सारी, वय २१ वर्षे, रा. भाग्योदयनगर, गल्ली नं. २. बुशरा अपार्टमेंट, फ्लॅट नं. १३, कोंढवा खुर्द, पुणे (खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे एकुण ०७ गुन्हे दाखल आहेत.)

०२ वर्षाकरिता

बिबवेवाडी

साहील रफीक कलावगी, वय २१ वर्षे, रा. राजीव गांधीनगर, जुना बस स्टॉपजवळ, स्वामी समर्थ चाळ, अप्पर बिबवेवाडी, पुणे (खाजगी मालमत्तेचे नुकसान, मारहाण, धमकावणे, वहशत निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत.)

०२ वर्षाकरिता

मुंढया

करण हरीदास जाधव, वय २४ वर्षे, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे (जबरी चोरी, दरोडा तयारी, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे एकुण ०७ गुन्हे दाखल आहेत.)

०२ वर्षाकरिता

उपरोक्त सर्व तडीपार इसम हे २१ ते २५ वयोगटातील सराईत गुन्हेगार आहेत. सन २०२५ मध्ये यापुर्वी ०६ गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ ५ कार्यक्षेत्रातील १०० हुन अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलीसांचे बारकाईने लक्ष आहे. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासुन परावृत्त करण्यासाठी व गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आमचे रडारवरील आणखी १०० हुन अधिक गुन्हेगारांवर मोका, एमपीडीए, तडीपारीची कारवाई करणार आहोत.

वरीलप्रमाणे तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार हे त्यांचे हद्दपार कालावधीमध्ये पुणे शहर पोलीस आयुक्तालय, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे जिल्हयामध्ये दिसुन आल्यास तात्काळ पोलीस नियन्त्रण कक्ष संपर्क क्र. ११२ तसेच जवळील अथवा संबंधित पोलीस ठाणेस किंवा इकडील कार्यालयात संपर्क क्र. ०२०-२६८६१२१४ यावर संपर्क साधुन माहिती कळविण्याबाबत आम्ही डॉ. राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५. पुणे शहर सर्व नागरीकांना आवाहन करीत आहोत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट