पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे संकल्पनेतून एक खिडकी योजना शुभारंभ सोहळा संपन्न

प्रतिनिधी विश्वनाथ शेनोय
दि ०७ ठाणे
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी शासनाच्या सर्व विभागांना जनतेची कामे सुलभरित्या व तत्परतेने पार पाडण्यासाठी १०० दिवस कृती आराखडा दिलेला आहे.त्यास अनुसरून पोलीस आयुक्त, ठाणे शहर श्री. आशुतोष डुंबरे यांचे संकल्पनेतुन दिनांक ०७.०४.२०२५ रोजी पासुन पोलीस आयुक्त कार्यालय, तळ मजला, ठाणे या ठिकाणी ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करण्यात आली आहे.एक खिडकी योजनेअंतर्गत पोलीस आयुक्त कार्यालयास नागरिकांकडून प्राप्त होणारे अर्ज, प्रस्ताव तसेच वरिष्ठ कार्यालय टपाल, न्यायालयीन टपाल यांची वेळेत पुर्तता करणे तसेच पोलीस आयुक्त कार्यालयातील परवाना शाखेतुन देण्यात येणारे सर्व प्रकारचे परवाने व नाहरकत दाखले हे एकाच ठिकाणी मुदतीत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत व त्यामुळे नागरीकांची कामे वेळेत व सुलभतेने होण्यास मदत होणार आहे.



