भारतीय संघात निवड होऊन अॅथलेटीक्स स्पर्धेत अति उल्लेखनीय खेळ करुन देशाचे ,सांगली जिल्ह्याचे व पोलीस दलाचे नाव उंचावणाऱ्या पोलीसांवर कौतुकांचा वर्षाव..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई ;भारतीय संघात निवड होऊन कर्नाटक येथे दिनांक 10 ते 12 जानेवारी 2025 रोजी झालेल्या साऊथ एशियन ओपन मास्टर अॅथलेटीक्स स्पर्धा 2025 मध्ये सांगली पोलीस दलातील सपोफौ अनिल श्रीपती खोत, नेमणुक मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, यांनी वयोगट 50 प्लस यामध्ये चार बाय शंभर या खेळ प्रकारात व्दितीय क्रमांक व पोलीस नाईक अविनाश तानाजी लाड नेमणुक अर्थिक गुन्हे शाखा, यांनी वयोगट 35 प्लस यामध्ये चार बाय शंभर या खेळ प्रकारात व्दितीय क्रमांक व 400 मिटर मध्ये तृतीय क्रमांक मिळवून आपल्या देशाचे व सांगली जिल्हयाचे तसेच महाराष्ट्र पोतीस दलाचे नाव उंचावले आहे. याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर स्पर्धेसाठी मा. पोलीस अधीक्षक संदीप धुने, मा. अपर पोलीस अधीक्षक, रितु खोखर, पोलीस निरीक्षक, अजित सीद, मिरज ग्रामीण पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक, अरुण सुगावकर, आर्थिक गुन्हे शाखा, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दोन्ही खेळाडु हे वाचक शाखेचे पोलीस हवालदार अभिजीत फडतरे यांचेकडे सातत्याने खेळाचे प्रशिक्षण घेवून सराव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट