भिवर्गी येथे शाळेत चोरी करणाऱ्यावर उमदी पोलीसांनी कारवाई करुन ६१ हजारांचा मुद्देमाल केला जप्त…

उपसंपादक-रणजित मस्के
सांगली :– भिवर्गी (ता.जत) येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील ६१ हजार किमतीचे शैक्षणिक साहित्य लंपास करणाऱ्या संशयितास उमदी पोलिसांनी जेरबंद केले. नवनाथ आमगोंडा कराडे (वय २१, रा. केरेवाडी (तिकोंडी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २६ फेब्रुवारी रोजी घडली होती. याबाबत राजकुमार शिवण्णा वसर्गी यांनी उमदी पोलिसांत फिर्याद दिली होती.
चोरीच्या घटनेनंतर सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दोन पथके तयार करत तपास सुरू केला होता. पोलिसांनी आरोपीकडून भिवर्गी शाळेतील चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नूतन विद्यालय भिवर्गी या प्रशालेतील कार्यालयातील २६ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री एक लॅपटॉप, प्रिंटर, अॅम्प्लीफायर असे साहित्य लंपास केले होते.
भिवर्गीतील नूतन माध्यमिक विदयालय शाळेच्या कार्यालयातील चोरी करणारा नवनाथ कराडे हा संशयित भिवर्गी फाट्यावर एका पान शॉपमध्ये थांबला आहे. पोलिसांनी तिथे जात ही कारवाई केली. उप विभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक संदीप शिंदे, आप्पासाहेब हाके, राम बन्नेनवार, मनीष कुमरे, संजय पांढरे, विक्रम राठोड, सुदर्शन खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली. रोजी रात्री एक लॅपटॉप, प्रिंटर, अॅम्प्लीफायर असे साहित्य लंपास केले होते.
भिवर्गीतील नूतन माध्यमिक विदयालय शाळेच्या कार्यालयातील चोरी करणारा नवनाथ कराडे हा संशयित भिवर्गी फाट्यावर एका पान शॉपमध्ये थांबला आहे. पोलिसांनी तिथे जात ही कारवाई केली. उप विभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक संदीप शिंदे, आप्पासाहेब हाके, राम बन्नेनवार, मनीष कुमरे, संजय पांढरे, विक्रम राठोड, सुदर्शन खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com