पोलीस ठाणे हद्दीत हरविलेल्या मोबाईल फोनपैकी जानेवारी 2023 ते मार्च 2023 पर्यंत 125 मोबाईल तसेच “सन 2018 ते मार्च 2023 पावेतो 1005 मोबाईल फोन वर्तकनगर पोलीस स्टेशनकडुन हस्तगत…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

ठाणे : वर्तकनगर पोलीस ठाण्याचे हद्दीत सन 2023 मध्ये मोबाईल फोन हरविलेबाबतच्या वेळोवेळी तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या. वरील प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्याचे नेमणुकितील मपोहवा / 6725 यशोदा घोडे व पो हवा / 6652 रविंद्र रावते, नेमणुक-वागळे इस्टेट पो.स्टे. सद्या प्रतिनियुक्ती- पोउपआ परि 5 वा. ई. विभाग,कार्यालय असे मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली हरविलेले मोबाईल फोन शोध घेण्याचे काम करतात.

मा. श्री. अमरसिंह जाधव पोलीस उप आयुक्त साो परि-5, वागळे इस्टेट विभाग, ठाणे तसेच मा. सहाय्यक पोलीस आयुक्त सो. अनिल देशमुख वर्तकनगर विभाग, ठाणे व मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सदाशिव निकम, व पोनि / महादेव कुमार वर्तकनगर पो.स्टे. यांचे मार्गदर्शनाखाली वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या नेमणुकितील मपोहवा / 6725 यशोदा घोड़े व पो.हवा / 6652 रविंद्र रावते यांनी हरविलेल्या मोबाईल फोनचा शोध घेणेकरीता मोबाईल फोनसंबंधीची माहिती मिळणेकरीता संबंधित मोबाईल फोन कंपनीचे सर्व्हिस प्रोव्हायडर यांचेशी पत्र व्यवहार करून संबंधित मोबाईल फोन कंपनीकडुन मोबाईल फोनसंबंधीची तांत्रिक माहिती प्राप्त करून घेतली व प्राप्त झालेल्या माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून महाराष्ट्र तसेच पं.बंगाल, कर्नाटक, उ. प्रदेश, तमिळनाडु, गुजरात या राज्यांतुन संबंधितांकडुन कुरिअर दवारे मागवुन घेतलेले आहेत. आज रोजी मा.पोलीस उप आयुक्त साो, यांचे हस्ते मासिक भेटी दरम्यान 40 मोबाईल मुळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत.

हरविलेले मोबाईल फोनपैकी “पोलीस ठाणे हद्दीत हरविलेल्या मोबाईल फोनपैकी जानेवारी 2023 ते मार्च 2023 पर्यंत 125 मोबाईल तसेच “सन 2018 ते मार्च 2023 पावेतो 1005 मोबाईल फोन वर्तकनगर पोलीस स्टेशनकडुन हस्तगत” करण्यात आले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *