पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण अप. क्र. ४७५/२०२३ कलम ३८० भादंविचे गुन्हयातील आरोपीस ताब्यात घेवून पुढील कार्यवाही होण्याबाबत…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- निवेदकः- भुवनलाल बाबुराव देशमुख, पो.हवा. १२७७, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया मो. क्र. ९५१८७७४७४४
आरोपी- खुशाल मोतीराम बहेकार वय २९ वर्ष रा. खमारी, ता. जि-गोंदिया. जात-कुनबी
महोदय,
सविनय सादर आहे की, मा. पोलीस अधिक्षक साहेब गोंदिया यांचे निर्देशाप्रमाणे व दिनेश लबडे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांचे आदेशा प्रमाणे आज दिनांक ३०/०१/२०२४ रोजी नियंत्रण कक्ष, गोंदिया स्टे.डा. सान्हा क्र. १८ / २०२४ चे. १०.११ वा. रवाना होवून आम्ही भुवनलाल बाबुराव देशमुख, पो.हवा. १२७७, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया सोबत पोउपनि महेश विघ्ने, स.फौ. अर्जुन कावळे ४१, पो. हवा. राजेंद्र मिश्रा ९१९, महेश मेहर ९५, पो.हवा. इंद्रजित बिसेन १४०६, पो.हवा. संतोष केदार/ २०८६, पो.हवा. तुलसिदास लुटे १२३१ स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया खाजगी व शासकिय वाहनाने असे गोंदिया ग्रामीण परिसरात चोरी/ घरफोडी / मो.सा.चोरीचे गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलींग व गुन्हेगार शोध करित असतांना पोलीस ठाणे गोंदिया ग्रामीण, परिसरात ग्राम खमारी येथे गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, खमारी येथील नामे खुशाल बहेकार याने एक मोठी एल. ई. डी. टिव्ही चोरी केली आहे. व तो टिव्ही विक्री करणार आहे अशी मुखबिर कडुन खात्रीशिर खबर मिळाल्याने सदर खबरेवर आम्ही व पंचनाम्यातील नमुद दोन पंच असे मिळुन त्याचा शोध केला असता तो आपले घरी हजर मिळुन आला.
त्यास आम्ही व आमचे स्टॉप व पंचाचा परिचय देवुन त्यास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव खुशाल मोतीराम बहेकार व २९ वर्ष रा. खमारी ता.जि-गोंदिया. असे सांगीतले. त्यास पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण अप. क्र. ४७५/२०२३ कलम,३८० भादवि. चे गुन्हया बाबत विश्वासात घेवुन बारकाईने विचारपुस केली असता त्यांने दिनांक ४/११/२०२३ चे रात्र दरम्याण दुर्गाटोली येथील राजीव अंबादे रा. खमारी च्या घराचे समोरील दाराचे हातोडीने ताला तोडुन आत प्रवेश करुन घरातील भिंतीवर लागलेली एक सोनी कंपनीची एलईडी पो.स्टे. गोंदिया टिव्ही, “व इंडीयन कपनीचा लोखंडी गॅस सिलेंडर व एक सॅमसन कपनीचा कॅमेरा चोरी केली आहे असे सांगीतले.
मी चोरी केलेला सामान माझे घरी ठेवलेला आहे असे सांगीतलेवर पंचनाम्यातील नमुद पंचासह त्याचे राहते घरी गेलो असता त्याने चोरी केलेला नमुद वर्णनाचा माल काढुन दिला तो खालील प्रमाणे आहे.
१) एक सोनी कंपनीची एल. ई. डी. टिव्ही जीचा मॉडल नंबर klv-32R412Cअं. किंमती ५०००/-रु

२) एक इंडीयन कंपनीचा लाल रंगाचा गॅस सिलेंडर किंमती २०००/-रु
३) एक सॅमसंग कंपनीचा सिल्वर रंगाचा कॅमेरा किंमती ५००/-रु.
४) एक लोखंडी हतोडी एका बाजुला कट असलेला किंमती ३००/- रु(गुन्हा करण्यास वापरलेले साधन)
५) एक लोखंडी कटोनी किंमती १००/-रुपये (गुन्हा करण्यास वापरलेले साधन)
असा एकुण किंमती ७,९००/- रु चा माल जप्ती पत्रका प्रमाणे जप्त करुन ताब्यात घेतला.
तरी सदर आरोपी नामे खुशाल मोतीराम बहेकार वय २९ वर्ष रा. खमारी, ता. जिल्हा गोंदिया यांने आपले पोलीस स्टेशन गोंदिया ग्रामीण अप क्र. ४७५/२०२३ कलम ३८० भादवि. चा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपीस ताब्यात घेवून पुढील कार्यवाही होण्यास विनंती आहे.
सहपत्र :-
१) जप्ती पत्र – १
२) जप्त मुद्देमाल-१
३) आरोपी-१
४) मेडीकल रिपोर्ट-१
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com