पोलीस ठाणे गंगापुर हद्यीतील श्रीकृष्णनगर, गंगापुर शिवारातील शेतातील कांदयाचे चाळीत सुरू असलेला जुगाराचा अड्डा उध्वस्त … अकरा आरोपींच्या ताब्यातुन 36,88,930/- रुपयांचा मुद्देमाल जप्त …

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

औरंगाबाद : मा. मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, औरंगाबाद ग्रामीण यांना गोपनीय बातमीदारा मार्फत गंगापुर हद्यीतील ज्ञानेश्वर रंगनाथ यादव रा. श्रीकृष्णनगर, गंगापुर याचे शेतातील 3000 स्क्वे.फुटाचे पत्र्याचे शेडमधील कांदयाचे चाळी मध्ये अवैधरित्या जुगार अड्डा चालु असल्याची माहिती मिळाली यावरून मा. पोलीस अधीक्षक यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सहा.पोलीस निरीक्षक सुदाम सिरसाठ व देविदास वाघमोडे यांचेसह पथकाला तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी खात्री करून छापा मारण्याचे सुचना दिल्या

मा. पोलीस अधीक्षक यांचे सुचना व मार्गदर्शनुसार पो.अ. कार्यालय येथील छापा पथकाला वैजापुर येथुन अधिक पोलीसांचे एक पथक देवुन पोलीसांची वाढीव कुवक देण्यात आली. यावेळी पोलीसांनी वेगवेगळी पथके तयार करून श्रीकृष्णनगर, गंगापुर येथील ज्ञानेश्वर रंगनाथ यादव यांचे शेताजवळ रात्री 08:00 वाजेच्या सुमारास सापळा लावला हा संपुर्ण परिसर अंदाजे जवळपास 11 एकरचा असुन संपुर्ण परिसराला संरक्षण भिंतीसह काटेरी तारेचे फेन्सिंग करण्यात आलेले आहे. या शेतातील प्रवेश करण्यासाठी फक्त एकच गेट असुन तो लॉक करून ठेवण्यात आला होता. तसेच गेट जवळील आत जाण्याचा परिसर 100 मिटर पेक्षा अधिक असल्याने याठिकाणी एक व्यक्ती हा येणा-या जाणा-यावर देखरेखी करिता ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलीसांची कोणतीही हालचाल ही लक्षात येताच आतील लोकांना सावध करण्याची व्यवस्था याठिकाणी करण्यात आली होती.
सापळा पथकातील पोलीसांनी या संपुर्ण परिसराची बारकाईने व छुप्यापध्दतीने पाहणी व पडताळणी करून छापा मारण्याचे नियोजन केले. यानुसार पोलीसांचे पथकांनी रात्री 09:00 वाजेच्या सुमारास अंधारात मुख्य प्रवेश द्वाराचे गेट व संरक्षण भिंतीवरून उडयामारुन शेतात प्रवेश केला. याठिकाणी लावण्यात आलेल्या काटेरी तारेचे फन्सिंगमुळे पोलीसांना आत प्रवेश करतांना तारेचे कट शरिरावर लागुन जखमा झाल्यात तरी पोलीसांनी जखमांचा विचार न करता अंधारात शेतात जावुन गेटपासुन काही अंतारवर लोखंडी जाळी असलेल्या पत्र्याचे शेडमधील कांद्याचे चाळीजवळ पोलीसांचे पथकाने लपत छपत जावुन पडताळणी केली असता तेथे 15 ईसम हे स्वत:चे आथिर्क फायदयासाठी पत्यावर रुपये लावुन तिर्रट नावाचा जुगार खेळ खेळत व खेळवित असतांना दिसले यावरुन अचानक घेराव टाकुन छापा टाकला असता यातील 04 ईसम हे अंधाराचा फायदा घेवुन बाजुच्या शेताताने पळुन गेले, तर इतर तिर्रट जुगार खेळणा-या 11 ईसमाना ताब्यात व विश्वसात घेऊन त्यांचे नाव गाव विचारता ती पुढील प्रमाणे सांगितली आहे.

1) ज्ञानेश्वर रंगनाथ यादव वय 45 वर्ष रा. श्रीकृष्णनगर,गंगापुर 2) शिवाजी नारायण खैरे वय 41 वर्षे रा वळदगाव, पंढरपुर, औरंगाबाद 3) चंद्रकांत भाऊसाहेब गायकवाड वय 35 वर्षे रा. गंगापुर 4) शुभम राधाकृष्ण साळवे वय 21 वर्षे रा.गंगापुर 5) मोहसीनअली अब्बास रजवी वय 33 वर्षे रा. औरंगाबाद 6) शफिक गुलाम रसूल वय 21 वर्षे रा.कन्नड 7) प्रकाश लहूजी खाजेकर वय 34 वर्षे रा.गंगापुर 8) रमेश एकनाथ मोरे वय 40 वर्षे घोडगाव, गंगापुर 9) संतोष नामदेव काळे वय 40 वर्षे रा.गंगापुर 10) हकिम शेख चाँद वय 20 वर्षे रा.गंगापुर 11) दिलीप नामदेव पवार वय 39 वर्षे रा. गंगापुर असे मिळुन आले आहेत.
त्याचे ताब्यातुन 3,36,230/- रुपये रोख तसेच 04 वाहने चारचाकी, 03 दुचाकी, मोबाईल हॅन्डसेट 13, जुगाराचे साहित्य असा एकुण 36,88,930/- (छत्तीस लक्ष एैठयांशी हजार,नऊशे तीस रूपये मात्र) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नमुद आरोपीविरुध्द पोलीस ठाणे गंगापूर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस ठाणे गंगापुर हे करित आहेत.

नमुद कारवाई ही मा.मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, मा. सुनिल कृष्णा लांजेवार, अपर पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सुदाम सिरसाठ, देविदास वाघमोडे, पो.उप.नि. श्रीराम काळे पोलीस अंमलदार सुनिल शिराळे, जावेद शेख, संदिप आव्हाळे, विनोद जोनवाल, कल्याण खेडकर, आत्माराम पैठणकर, दिनेश गायकवाड, अमोल मोरे, योगेश कदम, गोपाल जोनवाल यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट