पोलीस ठाणे गंगाझरी पोलीसांची कारवाई -अवैधरीत्या गोवंशीय जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल एकुण 24 गोवंशीय जनावरे/बैल, दोन आयशर ट्रक असा एकुण 24,80,000/- रुपयाचा मुददेमाल जप्त…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हददीत अवैधरित्या धंदे करणा-यावर कारवाई करण्याचे तसेच जिल्हयातील सर्व अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करून अवैध धंद्यावर आळा घालण्याकरीता पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, यांनी याबाबत सर्व ठाणे प्रभारी यांना निर्देशित केले होते.

        या अनुषंगाने मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांच्या आदेशान्वये मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा श्री. प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे गंगाझरी पोलीसांची अवैधरीत्या चालणाऱ्या धंदयाविरुध्द विशेष धाड मोहिम सुरु आहे.

            या अनुषंगाने दिनांक 07/08/2023 रोजी पोलीस स्टेशन गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. श्री. महेश बनसोडे यांना रात्री 08.00 वा. मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीच्या आधारे पो. स्टे. गंगाझरी येथील पोलिसांनी लेंडेझरी फाटा, चुटिया पांगडी रोड, मौजा पांगडी, ता.जि. गोंदिया येथे नाकाबंदी लावली. रात्री 21.30 वा. च्या सुमारास मौजा शहरवाणीकडून येणारे आयशर ट्रक क्र. एम एच 36 एफ 3533 व आयशर ट्रक क्र. एम एच 35 ए जे 1664 ही दोन गेरुवा रंगाची संशयित वाहने पोलिसांनी थांबवून त्या ट्रकच्या मागील डाल्याची पाहणी केली असता, पहिल्या आयशर ट्रक मध्ये एकूण 13 गोवंशीय जनावरे/बैल व दुसऱ्या आयशर ट्रक मध्ये एकूण 11 गोवंशीय जनावरे/बैल असे दोन्ही ट्रकमध्ये मिळून 24 जनावरे/बैल एकूण किंमत 4,80,000/- रू. अवैधरीत्या कत्तलीकरीता निर्दयतेने, चाऱ्या पाण्याविना कोंबून बंदिस्त करून वाहतूक करताना आढळून आली. दोन्ही ट्रकच्या चालकाकडे त्याबाबत कोणताही परवाना नसल्याने जनावरासहीत ते दोन्ही ट्रक (किंमत 20,00,000/-) असा एकूण 24,80,000/- रु. किमतीचा माल ताब्यात घेण्यात आला.

          24 गोवंशीय जनावरे सुरक्षेच्या दृष्टीने व त्यांच्या चारापाण्याची व्यवस्था व्हावी याकरीता कोरणी येथील गौशाळेत दाखल करण्यात आलेली आहेत.

सदर प्रकरणी आरोपी नामे —————–
1) इमरान उर्फ सोहेल रियाज खान, वय 27 वर्ष,रा. चंगेरा, ता.जि. गोंदिया

2). वसीम रफिक खान, वय 31 वर्ष, रा. चंगेरा, ता.जि. गोंदिया

3) प्रकाश उर्फ छोटू रतीराम कोंबडे, वय 24 वर्ष, करा डांगुर्ली ता.जि. गोंदिया.

4) ठाणेश चंदन देशकर, वय 30 वर्ष, रा. चंगेरा, ता.जि. गोंदिया.

5) उमेश उर्फ बंडू सयसराम राहंडाले, वय 32 वर्ष, रा. शहारवाणी, ता गोरेगाव, जि. गोंदिया.

6) इमरान रेहमान शेख, वय 30 वर्षे, ता.जि. गोंदिया

     यांचेविरुध्द पोलीस ठाणे गंगाझरी येथे अप.क्र. 279/2023 कलम 11 (1),(ड) (इ) प्रा.छ. प्रति. अधि. सह कलम 5, 6, 9 महा. पशु संवर्धन अधि. 1967 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास व कायदेशीर कारवाई पोलीस स्टेशन गंगाझरी येथील पोलीस करीत आहेत. 

         सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा श्री. प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे,

पो.उप.नि. पराग उल्लेवार, स.फौ. मनोहर अंबुले, पो.हवा. रामेश्वर बर्वे, चा.पो.हवा. तुळशीदास पारधी, पो.ना. महेंद्र कटरे, पो.शि. हरिकिशन भेलावे, संतोष लांजेवार, राजेश राऊत, रेखलाल पारधी, संदीप बारई, श्रीकांत नागपुरे, यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट