पोलीस अधीक्षकांकडून अंभोरा ठाणेदारांसह कर्मचाऱ्यांचे कौतुक प्रशस्तीपत्र देऊन केला सन्मान!

0
Spread the love

बीड

प्रतिनिधी-मनोज गोरे

पोलीस अधीक्षकांकडून अंभोरा ठाणेदारांसह कर्मचाऱ्यांचे कौतुक प्रशस्तीपत्र पत्र देऊन केला सन्मान! बीड- वाहिरा येथील दुहेरी हत्याकांड, जबरी चोरी,घरफोडी प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून अटक आरोपीकडून १४ गुन्ह्याची उकल करत हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नसल्याने पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत याच्याकडून अंभोरा ठाण्याचे ठाणेदारांसह कर्मचाऱ्यांचे कौतुक करत प्रशस्तीपत्र देऊन मंगळवारी सन्मानित करण्यात आले. आष्टी तालुक्यातील वाहिरा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपीच्या अवघ्या काही तासांत मुसक्या आवळल्या.तसेच जबरी चे तपासा दरम्यान इतर चोरी,घरपोडी जबरीचोरी असे अटक आरोपीकडून वेगवेगळ्या ठिकाणचे १४ गुन्हे उघडकीस आणले.अत्यंत संवेदनशील प्रकरणांमध्ये कायदा सुव्यवस्था संस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिला नाही.त्यामुळे पोलीस अधीक्षक यांनी अंभोरा ठाण्याला भेट देऊन पोलीसांचा सन्मान केला होता. त्याबद्दल मंगळवारी पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत ठाणेदार मंगेश साळवे याच्यासह पोलीस हवालदार बाबासाहेब गर्जे, पोलीस अंमलदार शिवदास केदार, सुदाम पोकळे, याच्यासह कर्मचाऱ्यांचे कौतुक करत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. माझे नव्हे पुर्ण टीमचे यशठाणे हद्दीत काम करताना हद्दीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व चोरी,घरफोडी,जबरी चोरीतील आरोपीना मोठ्या शिताफिने पकडून अटक केली.त्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले.हे यश माझ्या एकट्याचे नव्हे तर पुर्ण टीमचे असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *