पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथे नियत वयोमानाने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे निरोप सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न

सह संपादक – रणजित मस्के
गोंदिया
आज दिनांक 31 मे 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे-मे/2025 मध्ये गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले
1) श्रेणी पोलीस उप-निरीक्षक श्री. गोपाल धाडु कापगते,
2) श्रेणी पोलीस उप-निरीक्षक श्री. विनायक कोलुजी पुडो, तसेच
3) पोलीस अंमलदार श्री. आंनदराव चेपाजी करमरकर






यांचे निरोप सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते....सदर निरोप सत्कार समारंभ कार्यक्रम प्रसंगी पोलीस अधीक्षक गोंदिया मा.श्री. गोरख भामरे, यांचे शुभ हस्ते सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकारी- अंमलदार यांना शाल, श्रीफळ, झाडाची रोपटे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतीचिन्ह, भेटवस्तु देवुन त्यांचे सत्कार करण्यात आले.... असुन त्यांच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीस शुभेछ्या देण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, तसेच प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह) श्रीमती नंदिनी चानपुरकर, तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह) श्रीमती नंदिनी चानपुरकर, यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता कल्याण शाखा येथील, श्री. नंदिनी चानपुरकर, पोहवा राजु डोंगरे, राज वैद्य, यांनी कार्यवाही पार पाडली