पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे सेवानिवृत्त पोलीस अंमलदार यांचे सत्कार सभारंभाचे आयोजन…

सह संपादक -रणजित मस्के
गोंदिया :-दिनांक ३०/०६/२०२५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथील Coneference Hall मध्ये माहे जुन २०२५ मध्ये गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले असुन त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.



१) श्रेणी पोलीस उप-निरीक्षक श्री. अंनतराम तुलावी
२) श्रेणी पोलीस उप-निरीक्षक श्री. देवराज चावके
३) सहायक पोलीस उप-निरीक्षक श्री. अश्विनीकुमार उपाध्याय
सदर सेवानिवृत्त सत्कार सभारंभ कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे यांचे शुभ हस्ते त्यांना शाल, श्रीफळ, झाडाची रोपटे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र, स्मृतीचिन्हे व भेट वस्तु देवुन त्यांचे सत्कार करण्यात आले. तद्नंतर सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांनी त्यांच्या कारर्गिद काळात पोलीस विभागात सेवा दिल्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले, आणि मा. पोलोस अधीक्षक गोंदिया यांनी त्यांच्या येणाऱ्या पुढील उज्वल भविष्याकरिता हार्दिक शुभेच्छा ” देवून त्यांनो पोलीस विभागात केलेल्या कार्मागरीबद्दल गौरवउद्गार काढले.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस निरीक्षक मानव संसाधन शाखा, श्रीमती नंदिनी चानपुरकर, यांनी केले. सदर कार्यक्रमात मा. पोलीस अधीक्षक यांच्यासह पोलीस उप-अधिक्षक (मुख्या.) श्री. रामदास शेवते तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार व सेवानिवृत्त पोलीस अंमलदारांचे कुटुंबीय उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता कल्याण शाखा येथील श्री. नंदिनी चानपुरकर, पोहवा लियोनार्ड मार्टीन व राज वैद्य, यांनी अथक परीश्रम घेतले.