पोलीस अधीक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनात “हेल्मेट जनजागृती मोहीम -” 2023 पो. ठाणे चिचगड, केशोरी तर्फे जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया : –







याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर, यांनी गोंदिया जिल्हयात मागील काही काळात अपघाताच्या घटनेत झालेली वाढ त्यामध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक असणे, वाहन चालक याने हेल्मेट न वापरल्याने अपघातात डोक्याला मार लागून मृत्यू चे अत्याधिक वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व नागरिकांनी वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करावे, हेल्मेटचा वापर करावा याकरिता जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पोलीस दला तर्फे जिल्हा वाहतुक शाखा'' तसेच पोलीस स्टेशन स्तरावरून नागरिकांना हेल्मेटचा वापर करण्याकरीता " जनजागृती अभियान "प्रभावीपणे राबवून वाढत्या अपघाताचे व अपघातात मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे असे निर्देश सूचना दिलेल्या होत्या.
त्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग देवरी, श्री. विजय भिसे, यांचे मार्गदर्शनाखाली, ' पोलीस स्टेशन चिचगड' पोलीस स्टेशन केशोरी अंतर्गत दि-11/07/20 23 रोजी " "हेल्मेट जनजागृती" मोहीम राबवून वाढत्या अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नागरिकांना वाहतुकीच्या नियमांबद्दल माहिती देऊन हेल्मेट चे महत्व पटवून दिले व हेल्मेट घालणार्या सुजाण नागरिकाचा "पुष्पगुच्छ" देऊन उचित गौरव करण्यात आला,
जनतेमध्ये हेल्मेट घालण्याविषयी जनजागृती करुन नागरिकांना, युवक युवती यांना खालीलप्रमाणे सूचना देऊन मार्गदर्शन करण्यात आले


1) वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे
2) बिना सीट बेल्ट शिवाय गाडी चालवू नये
3) मोटर सायकलचा वापर हा हेल्मेट घालूनच करावा
4) दारू पिऊन गाडी चालवू नये
5) लहान मुलांना गाडी चालवायला देता कामा नये
6) आपल्या गाडीचे सर्व कागदपत्रे हे सोबत ठेवावी
7) बिना परवाना वाहन चालवू नये,
8) सर्व वाहन चालकांनी स्वतःच्या गाडीमधे ‘प्राथमिक उपचार कीट’ ठेवावी
या बाबत नागरीकांना माहिती देण्यात आली.
त्याचप्रमाणे पो. ठाणे चिचगड अंतर्गत "एकलव्य केंद्रीय आश्रम शाळा", बोरगाव/बाजार व श्रीराम विद्यालय चिचगड येथे दि- 11/07/023 रोजी शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये चांगले नीतिमूल्ये रुजवून त्यांना जबाबदार व सुजाण नागरिक बनवणे तसेच वाहतुकीचे नियम, "हेल्मेट जनजागृती", याबाबतीत शालेय विद्यार्थी यांना ठाणेदार श्री. शरद पाटील यांनी मार्गदर्शन केले, यावेळी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होते. विद्यार्थी हे देशाचे भवितव्य पर्यायाने समाजाचे उद्याचे चांगले नागरिक असतात, त्यांना चांगल्या नवनवीन गोष्टी व सोशल मीडियाचा चांगला वापर करून स्वतःचे हित जोपासण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत.
1)बाल लैगिक अत्याचार,ऑनलाईन फसवणूक,
2)सायबर क्राईम बाबत माहिती ,
3)महिला सुरक्षितता
4)रस्ते अपघात व नियम जागरूकता
5) कोणत्याही व्यसना पासून दुर राहावे.
अश्याप्रकारे वरील सर्व मुद्यांची माहिती शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली.
त्याचप्रमाणे केशोरी पोलीस स्टेशनचे वतीने रस्ता सुरक्षा व हेल्मेट जनजागृती मोहीमे अंतर्गत "नवोदय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय केशोरी" येथे रस्ता सुरक्षा व वाहन चालवताना हेल्मेट परिधान करणे अनिवार्य याबाबत जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
जनजागृतिपर कार्यशाळेत मार्गदर्शक म्हणून ठाणेदार सोमनाथ कदम यांनी उपस्थित शालेय विद्यार्थी- विद्यार्थीनी व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना जिल्ह्यातील वाढते अपघात, त्यात मृत्यूचे अत्याधिक प्रमाण, हेल्मेट नसल्याने डोक्याला गंभीर जखम होऊन मृत्यूस कारणीभूत झाल्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच वाहतूक नियमाची माहिती नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले, तरी यापुढे दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट परिधान करणे अनिवार्य असून, दुचाकी वाहन चालक विना हेल्मेट, विनापरवाना मिळून आल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच महिला व बालकांचे अपहरण, लैंगिक गुन्हे, बालकांच्या वरील अत्याचार, मोबाईलचा वापर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासारख्या विषयावर सुद्धा सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com