पोलीस स्टेशन गंगाझरी पोलिसांची कारवाई – गुन्हा करण्याच्या इराद्याने रोडच्या कडेला अंधारात चाकूसह लपून बसलेल्या इसमाला पकडुन गुन्हा नोंद…
उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, गोंदिया जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन हददीत गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने संबंधित पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी रात्रीच्या वेळी सतर्कपणे गस्त करून गुन्हे करण्याच्या तयारीत असलेल्या इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे यांनी सर्व ठाणे प्रभारी यांना निर्देशित केले होते.
या अनुषंगाने दिनांक 12/08/2023 रोजी 00.30 वा. च्या सुमारास उपविभागीय रात्रगस्त दरम्यान पोलीस स्टेशन गंगाझरीचे पो.नि. महेश बनसोडे व स्टाफ यांना लेंडेझरी फाट्या जवळ, चुटिया पांगडी रोड, मौजा -पांगडी, ता. जि. गोंदिया येथे इसम नामे अजय हरिचंद्र येलसरे, वय 21 वर्ष, राहणार शीतला माता मंदिर जवळ, मजितपुर, गोंदिया हा रस्त्याच्या कडेला अंधारामध्ये स्वतःची मोटर सायकल होंडा लिओ एमएच 35 एइ 2230 सह थांबलेला दिसून आला. म्हणून त्याचेकडे विचारपूस करून त्याला त्या ठिकाणी थांबण्याचे कारण विचारले असता, त्याला त्याचे नीट कारण सांगता आले नाही. तसेच त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता, त्यांने कोणतेही समाधान कारक उत्तर न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने दोन पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक चाकू मिळून आला. गुन्हा करण्याच्या उद्देशाने तो रात्रीच्या वेळी रोडच्या कडेला अंधारात थांबला असल्याची पोलिसांची खात्री झाल्याने पोलिसांनी त्यास त्याची मोटर सायकल व त्याच्याकडील चाकू याच्यासह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीस्तव पोलीस स्टेशनला आणले. पोलीस स्टेशन गंगाझरी येथे त्याच्या विरोधात अप क्रमांक. 310/2023 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 अ अन्वये गुन्हा नोंद केला. प्रस्तुत गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन गंगाझरी येथील पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, मा. अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया कॅम्प देवरी श्री. अशोक बनकर यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा श्री. प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गंगाझरीचे ठाणेदार पो.नि. महेश बनसोडे, चा.पो.हवा. तुळशीदास पारधी, पो.ना. महेंद्र कटरे, पो.शि. प्रशांत गौतम यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com