अमरावती ग्रामीण अंतर्गत पोलीस स्टेशन चांदुर रेल्वे येथे विनयभंगाचे गुन्हयाचा तपास करून २४ तासाचे आत आरोपी विरूध्द दोषारोपपत्र कोर्टात दाखल..

सह संपादक – रणजित मस्के
अमरावती :

पोलीस स्टेशन मांदुर रेल्वे जिल्हा अमरावती ग्रामीण पेचे फिर्यादी कु. अबकड यांनी दिनांक ४/०५/२०२५ रोजी सकाळी ८.०० वा दरम्याण घरी घरगुती काम करत असतांना त्याचे शेजारी राहणारा आरोपी याने फियांदी हिचे घरी कोणी नसल्याचा फायदा घेत घरात प्रवेश करून तु माझे सोबत बोलत का नाही असे म्हणुन तीचा हात पकडून हात पौरगाळला व मिठीत पकडून विनयभंग केला अशा फिर्यादीचे लेखी फिर्याद वरून पो.स्टे. चांदुर रेल्वे येथे दिनांक ४/०५/२०२५ रोजी चे १२.४२ वा अप क. २३६/२०२५ कलम ३३३,७४,११५(२) बी एन एस. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे तपासादरम्याण मा. ठाणेदार श्री अजय आकरे साहेब यांचे मार्गदर्शनात मपोउपनी विना पन्डे पोहेकों शिवाजी घुगे, पोहेर्को राहुल इंगळे, नापोकों प्रशांत डोके यांनी लागलीच नमुद आरोपीचा त्याचे गावात जाउन शोध घेतला असता आरोपी पळून जाण्याचे तयारी असतांना मोठ्या शिताफीने आरोपीला पकडून ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळाचा सरकारी पंचाचे समक्ष पंचनामा तयार करण्यात आला ई साक्ष मध्ये नोंदी घेण्यात आल्या तसेच फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षदार यांचे बयान नोंदवण्यात आले त्याचप्रमाणे विद्यमान कोर्टाकडे कलम १८३ बी.एन.एस.एस प्रमाणे फिर्यादी यांचे बयाण नोंदविण्यात आले आहे
. दि.०४/०५/२०२५ चे १२.४२ वा सदरचा गुन्हा दाखल झाला त्याच दिवशी चांदुर रेल्वे पोलीसांनी गुन्हयाचा तपास पूर्ण करून दि.०५/०५/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा विद्यमान कोर्ट चांदुर रेल्वे येथे गुन्हयाचे दोषारोपपत्र तयार करून २४ तासाचे आत दाखल करण्यत आले आहे. सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. अनिल पवार याचे मार्गदर्शनाखाली पोनी अजय आकरे, महिला पो उप नी विना पन्डे पोहेकों शिवाजी घुगे, राहुल इंगळे,, प्रविण मेश्राम नापोकों प्रशांत ढोके यांनी केला.