पोलीस स्टेशन छावणी येथील महीला अमलदार यांनी भिमनगर भावसिंगपुरा या भागात बेकायदेशीर दारु अडयावर छापे मारुन ९,६०५/- रुपये देशी व विदेशी दारू केेली जप्त…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

छत्रपती संभाजी नगर :- थोडक्यात हकिकत :- दिनांक २४/०६/२०२३ रोजी पोउपनी श्री. डाके हे विशेष पथक पोलीस स्टेशन छावणी येथे कार्यरत असतना त्यांना गोपनीय रित्या माहीती मिळाली की. भिमनगर भावसिंगपुरा या भागात काही ठिकाणी अवैध रित्या मदय विक्री चालु आहे. त्यावरुन पोउपनी श्री. डाके यांनी पोलीस निरीक्षक श्री. कलास देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन छावणी येथील महीला अंमलदार यांचे चार पथक तयार केले पथक क्र. १) मपोअं/३१०७ मिना जाधव, मपोअं/३०५० अरुणा वाघेरे, पथक क्र.०२) मपोअं/ ३११८ सुमन पवार, मपो अं/ १२१० सविता लोंढे पथक क्र. ०३) पोउपनी श्री. डाके मपोशी २०३३ वैशाली चव्हाण पथक क्र. ०४)पोअं २८३७ ज्योती भोरे, मपोअं/ १०२९ प्रियंका बडुगे असे पथक तयार करुन भिमनगर भावसिंगपुरा या भागात रवाना केले.

वरील चारही पथक भिमनगर भावसिंपुरा येथे रवाना झाल्यावर पथक क्र. ०१ यांनी आरोपी नामे मनोज रामभाउ राउत वय: ३४ : १ ९ ३५४ भिमनगर भावसिंगपुरा यांचे घरात छापा मारला असता त्याचे घरी १८० मिली च्या ४२ देशी दारु भिंगरी संत्रा लेबल असलेल्या बाटल्या प्रत्येकी किमत ७०/-रु. एकुण २९४०/-रु. चा माल मिळुन आला.

पथक क्र.०२ यांनी आरोपी नामे आकाश प्रकाश अवसरमोल वय: ३० वर्षे राः भिमनगर भावसिंगपुरा याचे घरी छापा टाकला असता त्याचे ताब्यात १८० मिलीच्या ३४ देशीदारू भिंगरी संत्रा लेबल असलेल्या बाटल्या प्रत्येकी किंमत ७० रुपये एकूण २३८०/- रुपये किमतीचा माल मिळुन आला.

पथक क्र.०३ यांनी आरोपी नामे आशीष रणजीत खरात वय: २४ रा. तांबेगल्ली भिमनगर भावसिंगपुरा यांचे ताब्यात विदेशी दारु ऑफीसर चॉईस च्या १८० मिलीच्या ७ बाटल्या प्रत्येक किंमत १२५/-रु. व मॅकडॉल नं.०१ च्या १८० मिली च्या ०५ वाटल्या प्रत्येकी किमत १५०/-रु. एकुण १६२५/- रु किमतीचा माल मिळुन आला.

पथक क्र.०४ यांनी आरोपी नामे रोहीत कल्लू शिर्के वय: २८ रा. गल्ली क्र. ०१ भिमनगर भावसिंगपुरा याचे घरी छाप्यात १८० मिलोच्या ३८ देशीदारू भिंगरी संज्ञा असे लेबल असलेल्या बाटल्या प्रत्येकी किमत ७० रुपये एकूण २६६०/- रु. किमतीचा माल मिळून आला.

वरील सर्व आरोपीच्या ताब्यातून मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोनी श्री. कैलास देशमाने यांचे मागदर्शनाखाली पोउपनी श्री. डाके, मपोअ २०३३ वैशाली चव्हाण, मपोअ/३११८ सुमन पवार, मपोआ/ १२९० सविता लोंढे, मपोआ/ २८३७ ज्योती भोरे, मपोआ/ १०२९ प्रियंका बड़गे मपोआ/ ३१०७ मिना जाधव. मपोअ / ३०५० अरुणा बाघेरे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट