पोलीस अधिक्षक कार्यालय, गोंदिया येथे “छत्रपती शिवाजी महाराज” यांची जयंती उत्साहाने साजरी…

सह संपादक – रणजित मस्के
गोंदिया :- सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन 2025 मध्ये राष्ट्रपुरुष/थोर व्यक्ति संत व समाज सुधारक यांची जयंती साजरी करण्यात यावी…..असे निर्देश आहेत… त्याअनुषंगाने आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, गोंदिया येथे मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले… तद्नंतर त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन त्यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगण्यात आली.


सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक, गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, यांच्यासह पोलीस उप-अधीक्षक (मुख्या) गोंदिया श्रीमती नंदिनी चानपुरकर, पोलीस निरीक्षक श्री. रामेश्वर पिपरेवार, तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार, मोठया संख्येने उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com