पोलीस अधिक्षक कार्यालय, गोंदिया येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

गोंदिया

………महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग GAD – 49022/65/2024 – GAD (DESK-29) दिनांक- २७/१२/२०२४ शासन निर्णयान्वये तसेच पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुबंई यांचे पत्र क्र. पोमस /३६/र.व.का./ (८३००) शा. नि. अधिसुचना/०१/२०२३ मुंबई दिनांक- ३०/१२/२०२४ अन्वये सन-२०२५ मध्ये सर्व शासकिय कार्यालयात राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती, संत व समाज सुधारक यांची जयंती साजरी करण्यात यावी असे निर्देश आहेत….त्या अनुषंगाने मा.श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे शुभ हस्ते आज दिनांक-१४ एप्रिल २०२५ रोजी पोलीस अधीक्षक, कार्यालय गोंदिया येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमात मा. श्री. गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांच्यासह प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह), श्रीमती नंदिनी चानपुरकर, पोलीस निरीक्षक, श्री. अजय भुसारी, श्री. दिनेश लबडे, पोउपनि पुजा सुरळकर, सुखदेव राऊत, तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट