दोष सिध्दीसाठी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीसांचा श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांनी केला सन्मान…

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा :

सातारा जिल्हयातील वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बालकांवरील अत्याचार, ठकबाजी, महिलांवरील अत्याचार, हलगर्जीमुळे मृत्यु, गंभीर दुखापत या सारख्या गुन्हयाचे निकालामध्ये आरोपींना शिक्षा झालेल्या असून त्यामध्ये योगदान असलेले तपारी पोलीस अधिकारी, गुन्हयाचे तपासामध्ये मदत करणारे पोलीस अंमलदार, दोषारोप पत्र कोर्टात दाखल झाल्यानंतर आरोपील शिक्षा लागेपर्यंत कोर्टामध्ये पाठपुरावा करणारे सातारा जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पैरवी अधिकारी यांना या पुढेही अशाच प्रकारे चांगली कामगीरी करण्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून रोख रक्कम ३,१०,०००/- रुपये व प्रशस्तीपत्र श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक व श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे हस्ते देण्यात आले आहे…

श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा… “सातारा पोलीस दलामध्ये जिल्हयामध्ये गुन्हा सिध्दीचे प्रमाण वाढण्याचे दृष्टीने पोलीस दलामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या दृष्टीने तपास अधिकारी व अंमलदार, पैरवि अधिकारी यांना प्रोत्साहन मिळावे या करीता बक्षीस म्हणून रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. या उपक्रमांमुळे भविष्यात पोलीस अधिकारी व अंमलदार आपले नैसर्गिक व अभिजात गुण कौशल्याचा इष्टतम वापर करुन गुन्हयाचा दर्जात्मक व उत्कृष्टरित्या तपास करुन गुन्हे सिद्ध होण्याचदृष्टीने प्रोत्साहन मिळणार आहे.”

नोव्हेंबर २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीतील खुन, खुनाचा प्रयत्न, बालकांवरील अत्याचार, ठकबाजी, महिलांवरील अत्याचार, हलगर्जीमुळे मृत्यु, गंभीर दुखापत इत्यादी गुन्हयांमध्ये दोषसिध्दी मिळालेल्या उल्लेखनिय गुन्हयांमध्ये फलटण शहर, उंब्रज, सातारा शहर, शाहुपूरी, कराड शहर, कराड तालुका, मेढा, भुईंज, बडुज, ढेबेवाडी या पोलीस ठाणेतील तपासी अधिकारी, पैरवी अधिकारी, पोलीस अंगलदार यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात आलेले आहे. त्यापैकी विशेष उल्लेखनिय कामगिरी म्हणजे ढेबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्हयामध्ये आरोपींस मांदविस कलम ३०२, २०१ व ३७६ प्रमाणे फाशीची शिक्षा दिली, पोक्सो कलम ४ व ५ अन्वये २० वर्षे सश्रम कारावास व १ लाख रुपये दंड, तसेच बडुज पोलीस ठाणेमध्ये दाखल असलेल्या खुनाच्या गुन्हयामध्ये दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक व श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी राबविलेल्या प्रोत्साहनपर उपक्रमामुळे पोलीस अधिकारी व अमलदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे. यातील काही तपासी अधिकारी व अंमलदार सेवानिवृत्त झाले असले तरी श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक व श्रीमती आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे हस्ते झालेल्या सन्मानामुळे व पोलीस दलाकडुन गौरव करण्यात आल्याने आपण केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची चीज झाल्याची भावना अधिकारी व अगलदार यांनी व्यक्त केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट