अपघात व दिर्घ आजाराने निधन झालेले पोलीस अंमलदार यांचे कुटुंबीय यांना पोलीस अधिक्षक गोंदिया, यांचे हस्ते 10 लक्ष रुपयांचे “प्रतिकात्मक धनादेशाचे” वाटप…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :– याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोहवा/1025 रविंद्र हेमराज पारधी, नेमणुक पो.स्टे. नवेगावबांध यांचा दिनांक 14/05/2022 रोजी सायंकाळी पो.स्टे. गोंदिया ग्रामीण हद्यीत अपघात झाल्याने त्यांच्यावर वैद्यकिय उपचार सुरु होते… दिर्घ आजारानंतर दिनांक– 05/12/2022 रोजी त्यांचे राहते घरी मौजा श्री. समर्थ कॉलनी, गोंदिया येथे निधन झाले होते…
मा. संचालक विमा संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडुन “राज्य शासकिय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजने अंतर्गत रूपये 10,00,000/- (दहा लक्ष रूपये)मंजुर करण्यात आल्याने आज दिनांक 11/03/2024 रोजी पोलीस अधिक्षक कार्यालय, गोंदिया येथे मा. श्री. निखिल पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया व पोलीस उप-अधीक्षक (मुख्या.) गोंदिया श्रीमती नंदिनी चानपुरकर, यांच्या शुभ हस्ते नामनिर्देशित व्यक्ति लाभधारक म्हणुन त्यांची पत्नी- श्रीमती शुभांगी रविंद्र पारधी यांना विमा दाव्याची रक्कम l रूपये 10,00,000/- (दहा लक्ष रूपये) चे “प्रतिकात्मक धनादेश वाटप करण्यात आले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com